श्वेता तिवारीसोबत दिसणारा हा मुलगा कोण? गोव्यातील एका फोटोने सोशल मीडियावर उडवली खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2024 19:20 IST2024-02-19T19:19:52+5:302024-02-19T19:20:33+5:30

श्वेता तिवारीला टीव्ही मालिका 'कसौटी जिंदगी की' मधून घराघरांत ओळख मिळाली

Shweta Tiwari cosily posed for a mirror selfie with her Varun Kasturia in goa | श्वेता तिवारीसोबत दिसणारा हा मुलगा कोण? गोव्यातील एका फोटोने सोशल मीडियावर उडवली खळबळ

श्वेता तिवारीसोबत दिसणारा हा मुलगा कोण? गोव्यातील एका फोटोने सोशल मीडियावर उडवली खळबळ

श्वेता तिवारीला टीव्ही मालिका 'कसौटी जिंदगी की' मधून घराघरांत ओळख मिळाली. हिंदी मालिका, बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाची जादू दाखवणारी श्वेता सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असते.  सोशल मीडियावर तिची जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. सध्या सोशल मीडियावर तिचा एका तरुण मुलासोबतचा फोटो व्हायरल होत आहे. हा फोटो पाहून सोशल मीडियावर अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. तर हा मुलगा कोण आहे आणि त्याचं श्वेताशी काय नातं आहे हे जाणून घेऊया. 

श्वेता तिवारी सध्या गोव्यात असून व्हॅकेशन एन्जॉय करत आहे. यातच तिने एक मिरर सेल्फी इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. यामध्ये श्वेतासोबत एक तरुण दिसत आहे. तर तिच्यासोबत दिसणाऱ्या या मुलाचे नाव वरुण कस्तुरिया असे आहे. श्वेता ही वरुणला आपला मुलगा मानते. 'काव्या-एक जज्बा एक जुनून' या मालिकेत दोघांनी आई आणि मुलाची भूमिका साकारली होती.  त्यामुळे तिनं पोस्टमध्येही #Goa 2.0 सह #motherandson हा हॅशटॅग आहे. यातून तिने सोशल मीडियावरील लोकांना हा तरुण आपला मुलगा असल्याचे सूचवलं आहे. 

श्वेता तिवारी हिचे पहिले लग्न राजा चाैधरी याच्यासोबत झाले. मात्र, त्यानंतर श्वेता तिवारी हिने राजा चाैधरी याच्यासोबत घटस्फोट घेत अनुभव कोहली याच्यासोबत लग्न केले. पण, यांचा संसार देखील टिकू शकला नाही. अनुभव कोहली आणि श्वेता तिवारी यांचा देखील घटस्फोट झाला. आता श्वेता तिवारी ही मुंबईमध्ये अत्यंत आलिशान घरात आपल्या मुलांसोबत राहते. श्वेता 43 वर्षांची असून दोन मुलांची आई आहे. तिला पलक तिवारी ही 23 वर्षांची मुलगी असून ती मॉडेलिंग करते. तर रेयांश हा 7 वर्षाचा मुलगा आहे. तर श्वेता नुकतेच इंडियन पुलिस फोर्स या सीरिजमध्ये दिसली होती. 

Web Title: Shweta Tiwari cosily posed for a mirror selfie with her Varun Kasturia in goa