फुग्यांनी सजवलेली रुम, केक अन्...; हनिमूनला गेलेल्या मराठी अभिनेत्रीला लग्नानंतर नवऱ्याकडून वाढदिवशी मिळालं खास सरप्राइज
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2024 13:54 IST2024-05-15T13:53:53+5:302024-05-15T13:54:40+5:30
लग्नानंतर सध्या अमृता आणि शुभांकर हनिमूनसाठी व्हिएतनामला गेले आहेत. तिथे अमृताच्या वाढदिवशी शुभांकरने तिला खास सरप्राइज दिलं आहे.

फुग्यांनी सजवलेली रुम, केक अन्...; हनिमूनला गेलेल्या मराठी अभिनेत्रीला लग्नानंतर नवऱ्याकडून वाढदिवशी मिळालं खास सरप्राइज
टीव्हीवरील लोकप्रिय कपल असलेले अमृता बने आणि शुभंकर एकबोटे नुकतेच विवाहबंधनात अडकले. 21 एप्रिल 2024 ला अमृता आणि शुभंकरने लग्नगाठ बांधून नव्या आयुष्याला सुरुवात केली. त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. लग्नानंतर सध्या अमृता आणि शुभांकर हनिमूनसाठी व्हिएतनामला गेले आहेत. तिथे अमृताच्या वाढदिवशी शुभांकरने तिला खास सरप्राइज दिलं आहे.
व्हिएतनाममध्ये अमृताने शुभांकरबरोबर तिचा वाढदिवस सेलिब्रेट केला. शुभांकरने अमृताला खास सरप्राइज दिलं. संपूर्ण रूम शुभांकरने डेकोरेट केली होती. याचा व्हिडिओ अमृताने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडिओत रुममध्ये फुग्यांची सजावट केल्याचं दिसत आहे. शुभांकरने दिलेलं सरप्राइज पाहून अमृताही आश्चर्यचकित झाली आहे. तिच्या चेहऱ्यावरचा आनंद स्पष्ट दिसत आहे. नंतर केक कापून अमृताने वाढदिवस सेलिब्रेट केल्याचं पाहायला मिळत आहे. हा व्हिडिओ शेअर करत अमृताने "तो आणि माझा वाढदिवस...परफेक्ट हनिमून कॉम्बो" असं कॅप्शन दिलं आहे.
'कन्यादान' या मालिकेत अमृता बने आणि शुभंकर एकबोटे यांनी काम केलं होतं. मालिकेच्या सेटवर अमृता आणि शुभंकरची ओळख झाली होती. मालिकेतही त्यांनी एकत्र स्क्रीन शेअर केलं होती. त्यांनी साकारलेली वृंदा आणि राणा ही भूमिका खूप गाजली. काही काळ डेट केल्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.
शुभंकर हा दिवंगत अभिनेत्री अश्विनी एकबोटे यांचा मुलगा आहे. आईच्या पावलावर पाऊल ठेवत शुभंकरनेही मराठी सिनेइंडस्ट्रीत स्वतःची ओळख बनवली. 'धर्मवीर', 'सरसेनापती हंबीरराव' या सिनेमांमध्ये तो झळकला आहे. लवकरच तो 'छावा' या विकी कौशलची मुख्य भूमिका असलेल्या सिनेमात काम करताना दिसणार आहे. तर अमृता बनेनं 'सातव्या मुलीची सातवी मुलगी', 'कन्यादान', 'रंग माझा वेगळा' आणि 'वैजू नंबर 1' या मालिकांमध्ये काम केलं आहे.