'श्री कृष्णा' मालिकेतील रुक्मणी आता अशी दिसते, फोटो पाहून बसेल धक्का
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2023 15:59 IST2023-10-10T15:56:43+5:302023-10-10T15:59:49+5:30
छोट्या पडद्यावरची 'श्री कृष्णा' ही पौराणिक मालिका चांगलीच प्रसिद्ध झाली होती.

Shri Krishna aka Pinky parikh viral photos
९० च्या दशकातील प्रसिद्ध निर्माता-दिग्दर्शक रामानंद सागर यांच्या रामायण, लव कुश, साई बाबा आणि श्री कृष्णा या पौराणिक मालिकांनी छोटा पडदा चांगलाच गाजवला. या मालिकेतील अभिनेते आणि अभिनेत्री रातोरात प्रसिद्ध झाले होते. छोट्या पडद्यावरची 'श्री कृष्णा' ही पौराणिक मालिका चांगलीच प्रसिद्ध झाली होती.
'श्री कृष्णा' 1993 ते 1997 पर्यंत चालली होती. कृष्णापासून रुक्मणीपर्यंत सर्वांनाच प्रेक्षकांचे प्रेम मिळाले. आता या मालिकेला 30 वर्षे झाली आहेत. 'श्री कृष्णा' मालिकेत रुक्मणीची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री पिंकी पारेख यांनाही प्रत्येक घराघरात वेगळी ओळख मिळाली. आजही या मालिकेतील 'रुक्मणी'वर प्रेक्षक भरभरुन प्रेम करतात. सध्या त्यांच्या समोर आलेल्या फोटोमध्ये पिंकी पारेख यांना ओळखणेही कठीण झाले.
पिंकी पारेख सोशल मीडियावर सक्रिय आहेत. व्हिडीओ आणि फोटो त्या पोस्ट करत असतात. अभिनयातून ब्रेक घेतल्यानंतर त्यांनी पुन्हा 2021 साली एक गुजराती टीव्ही शो केला, जो अजूनही चालू आहे.
'श्री कृष्णा' ही २२१ भागांची मालिका रामानंद सागर यांनी दिग्दर्शित केली होती, ज्यामध्ये सर्वदमन डी बॅनर्जी मुख्य भूमिकेत कृष्णाची भूमिका साकारताना दिसले होते. रेश्मा मोदी यांनी राधाची भूमिका केली होती. तर पिंकी पारेख रुक्मणीच्या भूमिकेत दिसल्या होत्या.