‘किचन कल्लाकार’च्या सेटवर श्रेया बुगडेला रडू आवरेना, पाहा व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2022 05:10 PM2022-02-15T17:10:35+5:302022-02-15T17:14:16+5:30

Shreya Bugde : ‘किचन कल्लाकार’च्या सेटवर असं काही झालं की, श्रेया बुगडे ढसाढसा रडू लागली. नेमकं काय झालं?

Shreya Bugde celebrated her birthday on Kitchen Kallakar set, got emotional | ‘किचन कल्लाकार’च्या सेटवर श्रेया बुगडेला रडू आवरेना, पाहा व्हिडीओ

‘किचन कल्लाकार’च्या सेटवर श्रेया बुगडेला रडू आवरेना, पाहा व्हिडीओ

googlenewsNext

सध्या छोट्या पडद्यावर झी मराठीवरील ‘किचन कल्लाकार’ (Kitchen Kallakar) या नवीन रिअ‍ॅलिटी शोची बरीच चर्चा आहे. नोव्हेंबर 2021 मध्ये सुरू झालेल्या या कार्यक्रमाने अल्पावधीत लोकप्रियता मिळाली. संकर्षण कऱ्हाडेया शोचा होस्ट. पण संकर्षण सुट्टीवर असल्याने गेल्या काही एपिसोडमध्ये ‘चला हवा येऊ द्या’ (Chala Hawa Yeun Dya) फेम श्रेया बुगडे (Shreya Bugde) हा शो होस्ट करताना दिसतेय. याच ‘किचन कल्लाकार’च्या सेटवर अचानक असं काही झालं की, श्रेया बुगडे ढसाढसा रडू लागली.

होय, नेमकं काय झालं तर, श्रेयाला सेटवरच्या सर्वांनी एक भारी सरप्राईज दिलं. नुकताच श्रेयाचा वाढदिवस साजरा झाला. पण वाढदिवसाला ती सेटवर नव्हती. कालपरवा ती सेटवर परतली आणि ‘किचन कल्लाकार’च्या टीमने श्रेयाला एक खास सरप्राईज दिलं. सर्वांनी श्रेयाच्या व्हॅनिटीमध्ये बर्थ डे सेलिब्रेशन केलं. हे धम्माल सरप्राईज पाहून श्रेया इतकी भारावली की तिला अश्रू अनावर झालेत.

2 फेब्रुवारीला श्रेयाचा वाढदिवस असतो. पण या वाढदिवसाला श्रेया पतीसोबत राजस्थानच्या टूरवर होती. याचे अनेक फोटोही श्रेयाने सोशल मीडियावर शेअर केले होते. सुट्टी घालवून श्रेया ‘किचन कल्लाकार’च्या सेटवर परतली आणि टीमने तिला गोड सरप्राईज दिलं.
चला हवा येऊ द्या’ या विनोदी कार्यक्रमात आपला अभिनय आणि व्यक्तिरेखांमुळे लोकांच्या घराघरात पोहोचलेली श्रेया बुगडे  आपल्या डिसेंट लूकमुळे नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत असते.

छोट्या पडद्यावरील कॉमेडी  शोमधून अभिनेत्री श्रेयाने महाराष्ट्रातील तमाम प्रेक्षकांची मनं जिंकली. अप्रतिम कॉमेडी टायमिंग आणि कलाकारांची हुबेहूब नक्कल करण्याची कला यामुळे श्रेया महाराष्ट्राला खळखळून हसवते. श्रेया मुळची पुण्याची आहे. बालपणापासूनच हुषार असलेली श्रेया कमी वयातच या इंडस्ट्रीत आली. बालनाट्यातून कमी वयातच तिने आपल्या अभिनयाची जादू दाखवून दिली.  शाळेचं शिक्षण पूर्ण होईपर्यंत श्रेयानं अनेक बालनाट्यात काम केलं होतं. कॉलेजला गेल्यानंतर कॉलेजसाठी काहीतरी करायचं अशा विचारातून तिनं कॉलेजच्या अनेक एकांकिका, नाट्यस्पर्धेत भाग घ्यायला सुरुवात केली. अस्मिता, माझे मन तुझे झाले, फु बाई फू या मालिकांमध्ये ती झळकली आहे. श्रेयाने   2015 मध्ये झाले निखिल सेठसोबत लग्नगाठ बांधली. दोघांचा प्रेमविवाह केला आहे. श्रेया आणि निखिल यांची ओळख एका मालिकेच्या चित्रीकरणादरम्यान झाली होती.

Web Title: Shreya Bugde celebrated her birthday on Kitchen Kallakar set, got emotional

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.