इंडियन आयडलसाठी नेहाला मिळते सगळ्यात जास्त मानधन, वाचा सगळ्यांची फी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2019 06:30 IST2019-10-21T06:30:00+5:302019-10-21T06:30:02+5:30
इंडियन आयडल या कार्यक्रमाचे परीक्षण करण्यासाठी परीक्षकांना आणि या कार्यक्रमाचा सूत्रसंचालक आदित्यला किती मानधन मिळते हे ऐकून तुम्हाला नक्कीच आश्चर्याचा धक्का बसेल.

इंडियन आयडलसाठी नेहाला मिळते सगळ्यात जास्त मानधन, वाचा सगळ्यांची फी
इंडियन आयडल या कार्यक्रमाचे आजवरचे सगळेच सिझन हिट गेले आहेत. आता या कार्यक्रमाचा नवा सिझन प्रेक्षकांच्या भेटीस येणार असून या कार्यक्रमाच्या जोरदार तयारीला आता सुरुवात देखील झाली आहे. इंडियन आयडलच्या या नव्या सिझनमध्ये म्हणजेच इंडियन आयडल 11 मध्ये नेहा कक्कड, विशाल दादलानी, अनू मलिक परीक्षकाच्या भूमिकेत दिसणार आहेत तर या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी आदित्य नारायण सांभाळत आहे.
इंडियन आयडल या कार्यक्रमाची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे. या कार्यक्रमाचे परीक्षण करण्यासाठी परीक्षकांना आणि या कार्यक्रमाचा सूत्रसंचालक आदित्यला किती मानधन मिळते हे ऐकून तुम्हाला नक्कीच आश्चर्याचा धक्का बसेल... इंडिया टिव्ही या वेबसाईटने दिलेल्या बातमीनुसार, इंडियन आयडल या कार्यक्रमातील सगळ्यांमध्ये नेहा कक्करला सगळ्यात जास्त मानधन मिळते. ती एका भागासाठी पाच लाख रुपये घेते. या कार्यक्रमाच्या या सिझनसाठी खरे तर नीती मोहन हे नाव चर्चेत होते. पण नेहा कक्करची पॉप्युलॅरीटी पाहाता या कार्यक्रमासाठी तिची निवड करण्यात आली. विशाल दादलानीला एका भागासाठी साडे चार लाख रुपये मिळतात तर अनू मलिकला चार लाख रुपये मिळतात.
आदित्य नारायणला इंडियन आयडल या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करण्यासाठी अडीज लाख रुपये मिळतात. त्याने याआधी सारेगमपा लिटिल चॅम्प्स, रायजिंग स्टार आणि किचन चॅम्पियन यांसारख्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले आहे.
इंडियन आयडल हा कार्यक्रम सुरू झाल्यापासून अनू या कार्यक्रमात परीक्षकाची भूमिका बजावत आहे. पण मीटू प्रकरणात त्याचे नाव आल्यानंतर गेल्या सिझनमधील काही भागात त्याला आपल्याला पाहायला मिळाले नव्हते. अनू मलिकची या कार्यक्रमातील शेरो शायरी प्रेक्षकांना प्रचंड आवडते. 2004 पासून सुरू झालेल्या या कार्यक्रमात तोच परीक्षकांची भूमिका बजावत आहे.
या कार्यक्रमातील त्याचे परीक्षण त्याच्या फॅन्सना प्रचंड आवडते. त्यामुळेच त्याला या सिझनमध्ये परत आणण्याचा निर्णय सोनी वाहिनी आणि या कार्यक्रमाच्या टीमने घेतला. हा सिझनदेखील प्रेक्षकांना आवडेल अशी या कार्यक्रमाच्या टीमला खात्री आहे.