Shocking...! या अभिनेत्रीनं पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांवर केला छेडछाडीचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2019 13:43 IST2019-08-26T13:43:31+5:302019-08-26T13:43:57+5:30

पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांनी या अभिनेत्रीसोबत केलेल्या छेडछाड प्रकरणी एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे.

Shocking ...! Bengali Actress Juhi Sengupta Allegedly Harassed By A Petrol Pump Staffer | Shocking...! या अभिनेत्रीनं पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांवर केला छेडछाडीचा आरोप

Shocking...! या अभिनेत्रीनं पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांवर केला छेडछाडीचा आरोप

मॉडेल आणि बंगाली अभिनेत्री जुही सेनगुप्ता हिला नुकताच एक वाईट अनुभव आल्याचं समोर आलं आहे. हा वाईट अनुभव जुहीने तिच्या फेसबुक पेजवर शेअर केला आहे. तिच्यासोबत कोलकाताच्या पेट्रोल पंपावर काही सदस्यांनी तिच्यासोबत वाईट वर्तणूक केली. त्यानंतर तिने थेट पोलीस स्टेशन गाठत तक्रार केली. या प्रकरणी पोलिसांनी एका कर्मचाऱ्याला अटक केली आहे.  

बंगाली मालिका भोजो गोविंदोमधून लोकप्रिय झालेली अभिनेत्री जुही सेनगुप्तानं सांगितलं की, ती कारमध्ये पेट्रोल टाकण्यासाठी पेट्रोल पंपावर गेली होती. त्यावेळी तिच्यासोबत पालकही होते. तिने पेट्रोल पंप कर्मचाऱ्याला १५०० रुपयांचं पेट्रोल भरायला सांगितलं आणि त्यांनी ३००० रुपयांचं पेट्रोल भरलं.


जुहीनं पुढं सांगितलं की, जेव्हा मी ३००० रुपयांचं पेट्रोल का भरलं त्यावर तो कर्मचारी माझ्याशी वाईट वर्तणूक करू लागला. इतकंच नाही तर तिथल्या दुसऱ्या कर्मचाऱ्याने आमच्या कारची चावी काढून घेतली. 


जुहीसोबत त्यावेळी तिचे आई वडीलदेखील होते. जेव्हा जुहीला पेट्रोल पंपवरील कर्माचाऱ्याला रोखण्याचा प्रयत्न केला तर त्यांनी तिला धक्का दिला. जुही म्हणाली की, कर्माचाऱ्याने धक्का दिल्यामुळे माझ्या हाताला दुखापत झाली. मात्र या सगळ्या वाईट प्रसंगाला माझ्या आई वडिलांनाही सामोरं जावं लागलं. त्या कर्मचाऱ्याने माझ्या वडिलांना धक्का दिला त्यानंतर मीदेखील त्या कर्मचाऱ्याला धक्का दिला. 


या घटनेनंतर जुहीने पोलिस स्टेशनला जाऊन तक्रार दाखल केली. याप्रकरणी पोलिसांनी महेश यादव नामक एका व्यक्तीला अटक केली आहे.

याप्रकरणी पोलिसांनी सांगितलं की, आम्ही सीसीटीव्ही फुटेज तपासत आहोत आणि पेट्रोल पंपावरील त्यावेळी उपस्थित कर्मचाऱ्यांकडे चौकशी सुरू आहे. एका व्यक्तीला अटक केली असून पुढील तपासणी सुरू आहे.

Web Title: Shocking ...! Bengali Actress Juhi Sengupta Allegedly Harassed By A Petrol Pump Staffer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.