"शिवोऽहम् शिवोऽहम्...", प्राजक्ता माळी येत्या वर्षात करणार '१२ ज्योतिर्लिंग यात्रा'
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2023 13:33 IST2023-10-23T13:33:38+5:302023-10-23T13:33:52+5:30
Prajakta Mali : प्राजक्ता माळी हिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. यात तिने येत्या वर्षाय १२ ज्योतिर्लिंग यात्रा करणार असल्याचे सांगितले आहे.

"शिवोऽहम् शिवोऽहम्...", प्राजक्ता माळी येत्या वर्षात करणार '१२ ज्योतिर्लिंग यात्रा'
मराठी सिनेइंडस्ट्रीत गुणी अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता माळी. अभिनेत्रीने आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर रसिकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे. ती सोशल मीडियावर सक्रीय असून या माध्यमातून चाहत्यांना अपडेट देत असते. तसेच तिचा सोशल मीडियावर फॅन फॉलोव्हिंगदेखील खूप आहे. दरम्यान आता तिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. यात तिने येत्या वर्षाय १२ ज्योतिर्लिंग यात्रा करणार असल्याचे सांगितले आहे.
प्राजक्ता माळी हिने इंस्टाग्रामवर परळी वैजनाथ मंदिरातील फोटो शेअर करत लिहिले की, चिदानंद रूपा “शिवोऽहम् शिवोऽहम्”… आजच्या सोमवारी संकल्प सोडला.. येत्या वर्षात “१२ ज्योतिर्लिंग यात्रा” करणार. आज सुरूवात झाली - “महाराष्ट्रातल्या - परळी वैजनाथ” पासून. (ही यात्रा एकसंधपणे करता आली असती तर जास्त आनंद झाला असता, पण कामाच्या commitments मध्ये ते शक्य नाही. आपणांस तसे जमत असेल तर जरूर करावे. एकसंधपणे यात्रा करणे इष्ट.)
वर्कफ्रंटबद्दल...
मालिका, चित्रपट, वेबसिरीज या तिन्ही माध्यमांमध्ये प्राजक्ताने आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. चित्रपटाबद्दल सांगायचं तर प्राजक्ता शेवटची लकडाउन चित्रपटात पाहायला मिळाली होती. या चित्रपटात तिच्यासोबत अकुंश चौधरी मुख्य भूमिकेत झळकली आहे. सध्या महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमात सूत्रसंचालन करताना दिसत आहे. या शोमधील तिच्या लूकची बऱ्याचदा चर्चा होताना दिसत आहे.