Bigg Boss Marathi 2: घरात अचानक चक्कर येऊन पडली शिवानी ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2019 17:11 IST2019-08-16T16:45:46+5:302019-08-16T17:11:12+5:30
आज बिग बॉस यांनी शिवला कन्फेशन रूममध्ये बोलावले आणि त्याला दिलेले संदेश पत्र सगळ्यांना वाचून दाखविण्यास सांगितले.

Bigg Boss Marathi 2: घरात अचानक चक्कर येऊन पडली शिवानी ?
आज बिग बॉस यांनी शिवला कन्फेशन रूममध्ये बोलावले आणि त्याला दिलेले संदेश पत्र सगळ्यांना वाचून दाखविण्यास सांगितले... काय असेल त्या संदेश पत्रामध्ये ? बिग बॉस सदस्यांना कोणता टास्क देणार ? की संदेश पत्रात घरच्यांसाठी त्यांच्या कुटुंबाने दिलेला संदेश असणार म्हणून शिव खुश झाला आहे हे आज कळेलच. घरामध्ये सगळे नीट सुरू असताना अचानक शिवानी चक्कर येऊन पडली नक्की काय झाले ? आणि त्यावर बिचुकले यांनी बिग बॉसना काय सांगितले ? हे नक्की बघा... काल पार पडलेल्या साप्ताहिक टास्कमध्ये सुशांतची टिम विजयी ठरली. काल सुशांत, मेघा आणि रेशमची घरातून एक्जिट झाली... बिग बॉस यांची घोषणा होताच रेशम टिपणीस घराचा निरोप निघताना खूप भाऊक झाली. आजचा टास्क काय असेल ? टास्कमध्ये कोण विजयी ठरणार ? हे बघणे रंजक असणार आहे.
घरामध्ये अनेक नाती तयार होतात मैत्रीचे, प्रेमाचे, पण हे नात विशेष आहे... आज शिवने किशोरी शहाणे यांना गिफ्ट देखील दिले आहे...शिव खूपच खुश आहे, “मी खूप लकी आहे किशोरी शहाणे यांनी मला राखी बांधली, माझ सगळ सहन करते... ताई अशीच असते जी सगळ सहन करते”अशाप्रकारे त्याने भावना व्यक्त केल्या.