हनिमून एन्जॉय करतायेत शिवानी-अजिंक्य, क्वालिटी टाइम स्पेंड करतानाचा व्हिडीओ आला समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2024 14:59 IST2024-02-09T14:56:55+5:302024-02-09T14:59:21+5:30

एक व्हिडीओ अजिंक्यनं सोशल मीडियावर शेअर केला आहे.

Shivani Surve & Ajinkya Nanaware spending quality time Video viral | हनिमून एन्जॉय करतायेत शिवानी-अजिंक्य, क्वालिटी टाइम स्पेंड करतानाचा व्हिडीओ आला समोर

हनीमून इन्जॉय करताय शिवानी-अजिंक्य, क्वालिटी टाइम घालवतानाचा व्हिडीओ आला समोर

मराठी कलाविश्वातील आणखी एक जोडपं विवाहबंधनात अडकलं.  शिवानी सुर्वे आणि अभिनेता अजिंक्य ननावरे यांनी १ फेब्रुवारीला लग्नगाठ बांधली आहे. ठाण्यातील येऊर येथील रिसॉर्टमध्ये त्यांचा शाही विवाहसोहळा पार पडला.  त्यांच्या लग्नातील फोटो चांगलेच चर्चेत आले होते. लग्नानंतर शिवानी व अजिंक्य फिरायला गेले आहेत. याचा एक व्हिडीओ अंजिक्यनं सोशल मीडियावर शेअर केला आहे.

अजिंक्यने सोशल मीडियावर शिवानीसोबत वेळ घालवतानाचे अनेक फोटो, व्हिडीओ शेअर केले आहेत. यामध्ये शिवानी आणि अजिंक्य क्वालिटी टाइम घालवत आहेत. व्हिडीओला दिलेल्या कॅप्शनमध्ये त्यानं लिहलं, 'चला पुन्हा एकदा नव्याने तिची ओळख करुन देतो. भेटा माझ्या पत्नीला'. शिवानी व अजिंक्यच्या या रोमँटिक व्हिडीओला चाहत्यांची पसंती मिळताना दिसत आहे.

शिवानी-अजिंक्यची लव्हस्टोरीही खूप हटके आहे. 'तू जीवाला गुंतवावे' मालिकेच्या सेटवरच दोघांची मैत्री झाली. मालिका संपल्यानंतरही ते एकमेकांच्या संपर्कात राहिले. पुढे दोघांमध्ये प्रेम फुललं. गेल्या ६ वर्षांपासून ते एकमेकांना डेट करत आहेत.  आता अखेर त्यांनी लग्न केलं. वर्कफ्रंटबद्दल बोलायचं तर, अजिंक्य हा 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' मालिकेत प्रमुख भूमिकेत आहे. तर शिवानी 'वाळवी' आणि झिम्मा २' सारख्या सुपर डुपर हिट चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. 

Web Title: Shivani Surve & Ajinkya Nanaware spending quality time Video viral