'शिवा' मालिका उत्कंठावर्धक वळणावर, कशी झाली शिवानाची शिवा?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2024 15:12 IST2024-02-17T15:11:52+5:302024-02-17T15:12:17+5:30
Shiva Serial : झी मराठीवर नुकतीच सुरु झालेली नवीन मालिका 'शिवा' लोकांच्या मनात घर करण्यासाठी सज्ज आहे. प्रत्येक पात्राला अगदी पहिल्या भागापासून प्रेक्षकांचं अपार प्रेम मिळत आहे.

'शिवा' मालिका उत्कंठावर्धक वळणावर, कशी झाली शिवानाची शिवा?
झी मराठीवर नुकतीच सुरु झालेली नवीन मालिका 'शिवा' (Shiva Serial) लोकांच्या मनात घर करण्यासाठी सज्ज आहे. प्रत्येक पात्राला अगदी पहिल्या भागापासून प्रेक्षकांचं अपार प्रेम मिळत आहे. आता ही मालिका उत्कंठावर्धक वळणावर आली आहे. आगामी आठवडा मालिकेचा अॅक्शन, इमोशन आणि ड्रामाने भरलेला असणार आहे.
या आठवड्यात शिवा या मालिकेत शिवा आणि आशुतोषच्या जीवनातल्या होणाऱ्या हालचाली पाहायला मिळणार आहेत. मंदिरात गुरुजीं आशुतोषचे लवकरच लग्न होणार अशी बातमी देतात, पण देसाईंच्या घरी लक्ष्मी नाही तर दुर्गा प्रकट होणार हे देखील सांगतात, यावर सगळ्यांना धक्का बसतो. तर दुसरीकडे दिव्या शिवाला वधू पाहण्याचा सोहळा थांबवण्याची विनंती करते. दरम्यान, दिव्याच्या या स्वार्थामुळे शिवा अडचणीत येते.
येणाऱ्या भागात आपण आपण पाहू शकणार आहोत शिवानी शिवा कशी झाली, शिवाय एका पार्टीत काही पुरुष दिव्याशी गैरवर्तणूक करण्याचा प्रयत्न करतात तेव्हा शिवा येऊन गुंडांपासून तिला वाचवते आणि तिकडे आशुतोष ही उपस्थित असतो. इकडे आशुचे बाबा रामचंद्र देसाई आशुच्या लग्नाचा प्रस्ताव घेऊन दिव्याच्या घरी जाणार आहेत. सारख्या येणाऱ्या स्थळांना वैतागून दिव्या स्वतःच्या ऐवजी शिवाची कुंडली दाखवते. आता काय होणार जेव्हा शिवा आणि आशुतोषची कुंडली गुरुजींसमोर येणार? त्यामुळे अॅक्शन, इमोशन आणि ड्रामाने भरलेला हा एपिसोड सोमवार ते शनिवार रात्री ९ वाजता झी मराठीवर पाहायला विसरू नका.