"मी मित्रांसोबत 'बडा रोजा' ठेवतो", शिव ठाकरेचा खुलासा; कारण सांगत म्हणाला...
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2024 19:30 IST2024-04-08T19:30:00+5:302024-04-08T19:30:02+5:30
जो बडा रोजा आहे २७ वा रोजा तो मी माझ्या मित्रांसोबत मिळून ठेवतो.

"मी मित्रांसोबत 'बडा रोजा' ठेवतो", शिव ठाकरेचा खुलासा; कारण सांगत म्हणाला...
अमरावतीचा वाघ शिव ठाकरे (Shiv Thakre) संपूर्ण महाराष्ट्राचा लाडका आहे. रोडीजपासून सुरु झालेला त्याचा करिअर ग्राफ दिवसेंदिवस उंचावतच आहे. 'बिग बॉस मराठी 2' तो विजेता ठरला आणि त्याच्या लोकप्रियतेत कमालीची वाढ झाली. यानंतर त्याने हिंदी बिग बॉसमध्येही प्रवेश घेतला. तिथे त्याने रनर अप पर्यंत मजल मारली. सलमान खानने सुद्धा त्याचं तोंडभरुन कौतुक केलं. सध्या रमजानचा पवित्र महिना सुरु आहे. शिवने याबाबतीत नुकताच एक खुलासा केला.
रमजानच्या आठवणींना उजाळा देताना Instant Bollywood ला दिलेल्या मुलाखतीत शिव ठाकरे म्हणाला, "रमजान म्हणलं की मला माझ्या मित्राची आठवण येते. त्याचं नाव ओहान आहे. तसंच खीर कुर्मासाठी आम्ही नेहमीच आतुर असायचो. रात्री ३ किंवा ४ वाजता आम्ही त्याच्या घरी जायचो. त्याची आई आम्हाला भरपूर खायला द्यायची."
तो पुढे म्हणाला, "जो बडा रोजा आहे २७ वा रोजा तो मी माझ्या मित्रांसोबत मिळून ठेवतो. कारण तो रोजा ठेवल्याने अनेक इच्छा पूर्ण होतात. तुम्ही मनापासून काही मागितलं तर ते पूर्ण होतं."
शिव ठाकरेने बिग बॉसनंतर अनेक रिएलिटी शोमध्ये सहभाग घेतला. 'झलक दिखला जा','खतरो के खिलाडी' यातही तो झळकला. सगळीकडूनच शिवला भरभरुन प्रेम मिळालं. सोशल मीडियावर त्याचे मिलियन्समध्ये फॉलोअर्स झाले.