Video: शिव ठाकरे होणार मुंबईकर; नव्या घराविषयी दिली मोठी हिंट

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2023 15:44 IST2023-11-13T15:43:58+5:302023-11-13T15:44:29+5:30

Shiv thakre: शिव ठाकरेचं मुंबईत होतंय घर; अभिनेता लवकरच होणार मुंबईकर

Shiv Thackeray will become a Mumbaikar A big hint about the new house | Video: शिव ठाकरे होणार मुंबईकर; नव्या घराविषयी दिली मोठी हिंट

Video: शिव ठाकरे होणार मुंबईकर; नव्या घराविषयी दिली मोठी हिंट

आपला हक्काचा माणूस म्हणून ओळखला जाणारा अभिनेता म्हणजे शिव ठाकरे. बिग बॉस मराठी २ चा विजेता ठरलेला शिव आज मराठीसह हिंदी कलाविश्वातही लोकप्रिय आहे. 'बिग बॉस 16', खतरों के खिलाडी अशा कितीतरी गाजलेल्या रिअॅलिटी शोमध्ये तो सहभागी झाला होता. त्यामुळे त्याची लोकप्रियता आता मर्यादित राहिलेली नाही. अमरावतीमध्ये लहानाचा मोठा झालेला शिव लवकरच मुंबईकर होणार आहे. लोकमत फिल्मीला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये त्याने याविषयी खुलासा केला आहे.
अलिकडेच शिवने लोकमत फिल्मीच्या दिवाळी शॉपिंग या सेगमेंटमध्ये सहभाग घेतला होता. यावेळी मुंबईच्या रस्त्यावरुन पणत्या, आकाशकंदील अशी खरेदी करत असताना त्याने त्याच्या मुंबईतील घराविषयी हिंट दिली. त्यामुळे येत्या काही काळात शिव ठाकरे अस्सल मुंबईकर होणार आहे. तसंच त्याचं हे नवं घर तो कोणासाठी खरेदी करतोय हे सुद्धा त्याने यावेळी सांगितलं.
"मला पण इथे ( मुंबई) रहायचं आहे, माझं पण इथे घर होतंय. मी बोलता बोलता जास्त सांगून जातो. पण, हो माझं घर होतंय इथे हळूहळू मी नक्की सांगेन तुम्हाला", असं शिव म्हणाला.

पुढे तो म्हणतो,"हे एवढं मोठं गिफ्ट आहे की ते घरातल्या प्रत्येकाला स्वतंत्र्यपणे नाही देऊ शकत. त्यामुळे हे घर सगळ्यांचंच आहे. आई वगैरे मध्ये-मध्ये इथे रहायला येतील. त्यांना आपलं गावचं जास्त आवडतं."

दरम्यान, शिव अत्यंत सामान्य कुटुंबातून आलेला आहे. त्यामुळे त्याने त्याच्यातला साधेपणा आजही जपून ठेवला आहे. त्याच्या स्वभावातील याच साधेपणामुळे आणि चाहत्यांशी प्रेमाने वागण्याच्या सवयीमुळे तो दिवसेंदिवस लोकप्रिय ठरत आहे.
 

Web Title: Shiv Thackeray will become a Mumbaikar A big hint about the new house