Shehnaaz Gill Video: 'लालबागच्या राजाच्या' दर्शनासाठी आली होती शहनाज गिल, सिद्धार्थ शुक्लाच्या टॅटूनं वेधलं नेटकऱ्यांचं लक्ष
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2022 19:03 IST2022-09-06T18:58:15+5:302022-09-06T19:03:15+5:30
लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी मध्यरात्री शहनाज गिल आली होती.बाप्पाच्या दर्शनासाठी ती एकटी पोहोचली नाही.

Shehnaaz Gill Video: 'लालबागच्या राजाच्या' दर्शनासाठी आली होती शहनाज गिल, सिद्धार्थ शुक्लाच्या टॅटूनं वेधलं नेटकऱ्यांचं लक्ष
शहनाज गिल जिथे जाते तिथे सिद्धार्थ शुक्ला तिच्यासोबत असतो. सिद्धार्थ शुक्ला या जगाचा निरोप घेऊन एक वर्षाहून अधिक काळ झाला आहे. पण आजही तो शहनाजच्या आसपास आहे. कधी अभिनेत्रीच्या हृदयात तर कधी भावाच्या हातावरच्या टॅटूच्यामध्ये. अलिकडेच शहनाज गिल तिचा भाऊ शाहबाज बदेशासोब लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी गेली होती.
गणपती बाप्पा दर्शनासाठी गेलेल्या शहनाज गिलसोबत तिचा भाऊ शाहबाज होता. सिद्धार्थच्या मृत्यूनंतर शाहबाजने त्याच्या हातावर सिद्धार्थचा टॅटू काढला आहे. सिद्धार्थ शुक्ला शहबाजच्या आयुष्याचा तसेच त्याच्या शरीराचा कायमचा भाग बनला होता.
लालबागच्या राजच्या दर्शनाना आलेल्या शाहबाजच्या हातावरील टॅटूवर पापाराझींची नजर पाडली. शहनाज गिल आणि शाहबाज बदेशाचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. या फोटोंमध्ये शहनाज पिवळ्या रंगाच्या सुंदर सूट आणि पलाझोमध्ये दिसत आहे. शहनाजच्या सूटवर एक सुंदर डिझाईन आहे. हातात चांदीच्या बांगड्या, कानात मोठे झुमके घालून शहनाज खूपच सुंदर दिसत आहे.
शहनाज गिल सध्या बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याच्या तयारीत आहे. शहनाज सलमान खानच्या 'किसी का भाई किसी की जान' या चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारताना दिसणार आहे. शहनाज गिलला बिग बॉस 13 मधून प्रसिद्धी मिळाली. या शोमध्ये तिची अभिनेता सिद्धार्थ शुक्लासोबत मैत्री होती. पुढे या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. 2021 मध्ये सिद्धार्थनं जगाचा निरोप घेतला.