'माझ्या शरीराविषयी मला काहीच तक्रार नव्हती, पण...'; शहनाज गिलने सांगितली weight loss journey
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2022 18:43 IST2022-01-28T18:43:07+5:302022-01-28T18:43:35+5:30
Shehnaaz gill: अभिनेता सिद्धार्थ शुक्लाच्या निधनाच्या धक्क्यातून सावरत असलेल्या शहनाजने अलिकडेच एका कार्यक्रमात हजेरी लावली होती.

'माझ्या शरीराविषयी मला काहीच तक्रार नव्हती, पण...'; शहनाज गिलने सांगितली weight loss journey
'बिग बॉस १३' (bigg boss 13) या रिअॅलिटी शोच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे शहनाज गिल (shehnaaz gill). आपल्या मस्तीखोर स्वभावामुळे शहनाजने बिग बॉससह असंख्य प्रेक्षकांची मनं जिंकली. अभिनेता सिद्धार्थ शुक्लाच्या निधनाच्या धक्क्यातून सावरत असलेल्या शहनाजने अलिकडेच एका कार्यक्रमात हजेरी लावली होती. यावेळी तिने दिलेल्या मुलाखतीत तिचा वजन कमी करण्याचा प्रवास कसा होता हे सांगितलं आहे.
काही दिवसांपूर्वीच शहनाजचा एक व्हिडीओ रिलीज झाला. या म्युझिक व्हिडीओच्या निमित्ताने तिने एक मुलाखत दिली आहे. यावेळी तिच्यासोबत यशराज मुखातेदेखील होता. या मुलाखतीत तिने करिअरसोबतच तिच्या पर्सनल लाइफविषयीदेखील अनेक गोष्टींचा खुलासा केला.
"लोकांना वाटायचं की मी कधीच वजन कमी करु शकणार नाही. पण, वजन कमी करणं हा आपला चॉइस आहे. त्यावेळी मला फारसं चांगलं कामही मिळत नव्हतं. त्यामुळे मी फारसं मनावर घेतलं नाही. पंजाबी इंडस्ट्रीमध्ये काम करताना माझ्या वजनाचा मला कधीच अडथळा जाणवला नाही. त्यामुळे मला माझ्या शरीर रचनेविषयी काही तक्रार नव्हती. पण, मी इंडस्ट्रीच्या बाहेर पडल्यावर मला काही गोष्टी जाणवल्या", असं शहनाज म्हणाली.
पुढे ती म्हणाली, "लोकांचं माझ्यावर किती प्रेम आहे हे मला समजलं. मला नवनवीन कामंही मिळू लागली होती. त्यामुळे वजन कमी करणं हा माझ्यासाठी टास्क राहिलेला नव्हता. मी खूप मुडी आहे. त्यामुळे जर मी एखादी गोष्ट करायचा निश्चय केला तर ती गोष्ट काहीही झालं तरी पूर्ण करते."
दरम्यान,अलिकडेच शहनाजचा हौसला रख हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. त्यानंतर अलिकडेच तिने यशराज मुखातेसोबत एक गाणं शूट केलं. या गाण्यात शहनाजने स्वत:चा आवाज दिला आहे.