"माझ्या आयुष्यात...", शेफालीच्या निधनानंतर अजूनही सावरला नाहीये पराग त्यागी; पत्नीच्या आठवणीत झाला भावुक, म्हणाला...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2025 16:54 IST2025-12-15T16:48:16+5:302025-12-15T16:54:16+5:30
पराग त्यागी शेफालीच्या आठवणीत झाला भावुक, व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील

"माझ्या आयुष्यात...", शेफालीच्या निधनानंतर अजूनही सावरला नाहीये पराग त्यागी; पत्नीच्या आठवणीत झाला भावुक, म्हणाला...
Parag Tyagi Post Video: कांटा लगा गर्ल, बिग बॉस १३ फेम शेफाली जरीवालाने अवघ्या ४२ व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. २७ जून रोजी तिच्या निधनाची बातमी आली आणि चाहत्यांना धक्काच बसला. शेफालीच्या निधनानंतर पती पराग पूर्णपणे खचून गेला आहे. त्या दु खातून तो अजूनही सावरलेला नाही.पराग अनेकदा पत्नीच्या आठवणीत सोशल मीडियावर फोटो, व्हिडीओ शेअ करत असतो. त्याची प्रत्येक पोस्ट शेफालीच्या चाहत्यांसाठी आणि त्यांच्या मित्रमंडळींसाठी काळीज पिळवटून टाकणारी ठरते.
शेफाली जरीवालाचा आज वाढदिवस आहे, यानिमित्ताने पराग त्यागीने पुन्हा एकदा त्याच्या लाडक्या 'परी'चा एक व्हिडिओ शेअर केला. हा व्हिडीओ पाहून चाहते देखील प्रचंड भावुक झाले आहेत. परागने शेफाली जरीवाला आणि त्याच्या आईचा डान्स करतानाचा एक जुना व्हिडिओ शेअर केला.ज्यात दोघही मनसोक्त नाचतना दिसत आहेत.
शिवाय या व्हिडिओसोबत त्याने लिहिलेलं कॅप्शन वाचून डोळे पाणावतील. या पोस्टमध्ये परागने लिहिलंय,"लोक म्हणतात की एका पुरुषाच्या यशस्वी मागे एका स्त्रीचा हात असतो. मी स्वत ला खूप भाग्यवान समजतो. कारण, माझ्या आयुष्यात परी आणि आई या दोन महिला आहेत. मित्रांनो,या दोघींचाही वाढदिवस एकाच दिवशी १५ डिसेंबरला असतो. Happy birthday my life... शेवटच्या श्वासापर्यंत मी तुझ्यावर प्रेम करत राहिन...", या पोस्टमुळे शेफाली आणि पराग यांचे चाहते भावुक झाले आहेत. अनेकांनी कमेंट करत परागला आधार देण्याचा प्रयत्न केला आहे.
शेफाली जरीवालाने २०१४ साली अभिनेता पराग त्यागीशी लग्न केलं. लग्न करण्यापूर्वी दोघेही लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. या जोडप्याच्या लग्नाला ११ वर्षे झाली होती. मात्र, काही महिन्यांपूर्वीच शेफालीचा मृत्यू झाला. अभिनेत्रीचा पती अभिनेता पराग त्यागीवर या घटनेनंतर दु:खाचा डोंगर कोसळला.