Shefali Jariwala: बायकोच्या अस्थी हृदयाला कवटाळल्या अन् ढसाढसा रडला, बघवत नाहीये पराग त्यागीची अवस्था
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2025 15:50 IST2025-06-29T15:50:06+5:302025-06-29T15:50:54+5:30
आज शेफालीच्या अस्थी कुटुंबीयांना सोपविण्यात आल्या. शेफालीच्या अस्थी हातात येताच पराग त्यागी ढसाढसा रडला.

Shefali Jariwala: बायकोच्या अस्थी हृदयाला कवटाळल्या अन् ढसाढसा रडला, बघवत नाहीये पराग त्यागीची अवस्था
Shefali Jariwala Death: 'काटा लगा गर्ल' शेफाली जरीवालाचं ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. तिच्या आकस्मिक मृत्यूने सगळ्यांनाच आश्चर्याचा मोठा धक्का बसला. शनिवारी(२८ जून) शेफालीच्या पार्थिवावर मुंबईत अंत्यसंस्कार करण्यात आले. आज शेफालीच्या अस्थी कुटुंबीयांना सोपविण्यात आल्या. शेफालीच्या अस्थी हातात येताच पराग त्यागी ढसाढसा रडला.
वरिंदर चावलाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन पराग त्यागीचा एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओत परागच्या हातात शेफालीच्या अस्थी दिसत आहेत. त्याच्यासोबत कुटुंबीयही दिसत आहेत. शेफालीच्या अस्थी हृदयाला कवटाळून पराग ढसाढसा रडत असल्याचं दिसत आहे. पराग त्यागीची अवस्था बघवत नाहीये. पत्नी शेफालीच्या अचानक झालेल्या मृत्यूने त्याला मोठा धक्का बसला आहे. यातून सावरण्याचा तो प्रयत्न करत आहे.
दरम्यान, शेफाली जरीवालाला काटा लगा गाण्यामुळे प्रसिद्धी मिळाली होती. अनेक मालिका, वेब सीरिज आणि काही सिनेमांमध्येही काम केलं. शेफालीला शुक्रवारी(२७ जून) हृदयविकाराचा झटका आला. तिला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र त्याआधीच डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं होतं. शेफाली आणि परागने २०१४ मध्ये लग्न केलं होतं. शेफालीचा पती परागदेखील एक लोकप्रिय अभिनेता आहे.