गोड बातमी! शशांक केतकर पुन्हा होणार बाबा, नववर्षाच्या सुरुवातीलाच चिमुकल्याची चाहूल
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2025 09:07 IST2025-01-01T09:06:11+5:302025-01-01T09:07:55+5:30
अभिनेता शशांक केतकरने २०२५च्या सुरुवातीलाच एक गोड बातमी चाहत्यांबरोबर शेअर केली आहे. शशांक पुन्हा बाबा होणार असून या वर्षात त्याच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन होणार आहे.

गोड बातमी! शशांक केतकर पुन्हा होणार बाबा, नववर्षाच्या सुरुवातीलाच चिमुकल्याची चाहूल
आजपासून नववर्षाला सुरुवात झाली आहे. २०२४ला निरोप देऊन सगळ्यांनीच मोठ्या जल्लोषात नववर्षाचं स्वागत केलं. अभिनेता शशांक केतकरने २०२५च्या सुरुवातीलाच एक गोड बातमी चाहत्यांबरोबर शेअर केली आहे. शशांक पुन्हा बाबा होणार असून या वर्षात त्याच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन होणार आहे. शशांक आणि प्रियंकाला नव्या पाहुण्याची चाहुल लागली आहे.
शशांक केतकरने नववर्षाचं स्वागत या गुडन्यूजने केलं आहे. शशांक आणि प्रियांका पुन्हा आईबाबा होणार आहेत. शशांकने पत्नी आणि लेकाबरोबर खास फोटोशूट केलं आहे. हे फोटो शेअर करत त्याने ही गुडन्यूज चाहत्यांबरोबर शेअर केली आहे. "२०२५ चं स्वागत या पेक्षा छान बातमीने होऊच शकत नाही. आम्ही पुन्हा एकदा आई बाबा व्हायला, ऋग्वेद दादा व्हायला आणि आमचे आई बाबा पुन्हा एकदा आजी आजोबा व्हायला तयार झालो आहोत", असं कॅप्शन त्याने या फोटोंना दिलं आहे. शशांकच्या या पोस्टवर कमेंट करत चाहत्यांनी त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.
होणार सून मी ह्या घरची मालिकेतून शशांकला प्रसिद्धी मिळाली. त्याने अनेक मालिका, सिनेमा आणि वेब सीरिजमध्येही काम केलं आहे. शशांकने २०१७ साली प्रियांका ढवळेसोबत लग्न करत संसार थाटला. त्यांना एक मुलगा आहे. आता पुन्हा आईबाबा होणार असल्याने दोघेही आनंदी आहेत.