जिच्यावर जीवापाड प्रेम केलं तिनेच दगा दिला! 'त्या' घटनेमुळे अभिनेत्याच्या करिअरवर लागला डाग, भांडी घासण्याची आली वेळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2025 16:40 IST2025-11-06T16:30:30+5:302025-11-06T16:40:33+5:30
शाहरुखचा सहकलाकार, एका प्रकरणामुळे करिअवर लागला डाग, अभिनेत्यावर आली भांडी घासण्याची आली वेळ

जिच्यावर जीवापाड प्रेम केलं तिनेच दगा दिला! 'त्या' घटनेमुळे अभिनेत्याच्या करिअरवर लागला डाग, भांडी घासण्याची आली वेळ
Eijaz Khan: हिंदी कलाविश्वात केवळ प्रतिभावान असून चालत नाही तर नशीबात यश लिहिलेले असणे आवश्यक असते. एकदा नशीबाने दगा दिला तर त्यापुढे कोणाचंही चालत नाही. अनेक मालिका आणि चित्रपटांमधून विविध धाटणीच्या भूमिका साकारणाऱ्या एजाज खानसोबत काहीसे असेच झाले.तनु वेड्स मनु रिटर्न्स आणि जवान सारख्या चित्रपटांमध्ये आपल्या दमदार अभिनयाने मन जिंकणाऱ्या एजाजला एक वेळचं अन्न मिळावं यासाठी भांडी घासावी लागली. ज्या मुलीवर जीवापाड प्रेम केलं तिने दगा दिला आणि त्याच्या कारकिर्दीला उतरती कळा लागली.
एजाज खान हा त्याच्या करिअरपेक्षा वैयक्तिक आयुष्यामुळे चांगलाच चर्चेत राहिला. अलिकडेच अभिनेत्याने एका मुलाखतीत त्याच्या लव्हलाईफबद्दल खुलासा केला. एजाज प्रसिद्धीच्या शिखरावर असताना एका मुलीच्या प्रेमात आकंठ बुडाला होता. पण, तिनेच तिची मोठी फसवणूक केली. अभिनेत्याच्या सांगण्यानूसार, एका पार्टीमध्ये त्यांची पहिल्यांदा भेट झाली होती. त्यानंतर त्यांच्यात मैत्री झाली आणि ते एकमेकांसोबत राहू लागले. एक महिन्यानंतर एजाजला असं जाणवलं की ते एकमेकांसाठी योग्य नाहीत. पण, हे तिला काही मान्य नव्हतं. याचा परिणाम असा झाला की अभिनेत्याचं राहतं घर त्याच्या हातून निसटलं. शिवाय एक्स गर्लफ्रेंडने त्याच्यावर बलात्काराचे आरोप केल्याने त्याला कित्येक महिने अंडरग्राउंड राहावं लागलं.
२००२ मध्ये आलेल्या 'मैंने दिल तुझको दिया' या चित्रपटामधील प्रभावी अभिनयाने एजाजने आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली.या काळात एजाजने सलमान खान आणि शाहरुख खानसोबत बॅकग्राउंड डान्सर म्हणूनही काम केलं. त्याचबरोबर २००३ मध्ये आलेल्या कुछ ना कहों चित्रपटातही तो दिसला. मात्र, त्याला खरी ओळख ही टीव्ही इंडस्ट्रीने मिळवून दिली.
कंगना राणौत स्टार तनु वेड्स मनु रिटर्न्स मधील त्याची भूमिका चांगलीच गाजली. याशिवाय एजाजने अलीकडेच शाहरुख खान अभिनीत "जवान" चित्रपटातही महत्त्वाची भूमिका साकारली.