"इथे सिक्युरिटी नाही, कमाईची गॅरंटी नाही...", शर्मिष्ठा राऊतने दाखवली ग्लॅमरस इंटस्ट्रीची दुसरी बाजू
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2025 14:58 IST2025-07-23T14:58:20+5:302025-07-23T14:58:40+5:30
शर्मिष्ठा राऊत हा मराठी टेलिव्हिजनचा लोकप्रिय चेहरा आहे. अनेक मालिकांमध्ये अभिनेत्रीने काम केलं आहे. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत शर्मिष्ठाने या ग्लॅमरच्या दुनियेची दुसरी बाजूही सांगितली आहे.

"इथे सिक्युरिटी नाही, कमाईची गॅरंटी नाही...", शर्मिष्ठा राऊतने दाखवली ग्लॅमरस इंटस्ट्रीची दुसरी बाजू
शर्मिष्ठा राऊत हा मराठी टेलिव्हिजनचा लोकप्रिय चेहरा आहे. अनेक मालिकांमध्ये अभिनेत्रीने काम केलं आहे. शर्मिष्ठा केवळ एक अभिनेत्रीच नव्हे तर ती निर्मातीदेखील आहे. 'जुळून येती रेशीमगाठी', 'उंच माझा झोका', 'सुखाच्या सरींनी हे मन बावरे', 'मुलगी झाली हो', 'अबोली', 'सारं काही तिच्यासाठी' या मालिकांमध्ये तिने महत्त्वाच्या भूमिका साकारल्या. तर 'नाच गं घुमा', 'हॅशटॅग तदैव लग्नम', 'चि व चि.सौ.का.' या सिनेमांमध्येही ती दिसली. 'बिग बॉस मराठी'मध्येही ती सहभागी झाली होती. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत शर्मिष्ठाने या ग्लॅमरच्या दुनियेची दुसरी बाजूही सांगितली आहे.
"या क्षेत्रात सिक्युरिटी नाही आणि कमाईची गॅरंटीही नाही", असं शर्मिष्ठा लोकशाही या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हणाली. यासोबतच तिने नवीन येणाऱ्या कलाकारांनाही सल्ला दिला. "या क्षेत्रात सिक्युरिटी नाही. इथे भरपूर स्ट्रगल आहे. एक काम संपल्यानंतर दुसरं काम लगेचच मिळेल, याची गॅरंटी नसते. त्यामुळे कमाईची गॅरंटी नाही. तुम्ही २ वर्ष सुपर डुपर कमवता. पण, पुढची २ वर्ष तुमच्याकडे काम नसेल. तर आयुष्यातली २ वर्ष वाया जातात. दोन वर्ष म्हणजे खूप मोठी स्पॅन आहे. याच्याबरोबरच नवीन येणाऱ्या मुलांनी त्यांचा दुसरा उद्योग सुरू ठेवला पाहिजे. नाहीतर ३०, ३२, ३५ वयातही मला लीड भूमिकाच हवी, हे बरोबर नाही", असं शर्मिष्ठा म्हणाली.
दरम्यान, शर्मिष्ठा राऊत आणि तेजस देसाई यांनी लॉकडाऊनमध्ये लग्न केलं होतं. ऑक्टोबर २०२०मध्ये लग्नाच्या बेडीत अडकत त्यांनी नव्या आयुष्याला सुरुवात केली होती. काही महिन्यांपूर्वीच शर्मिष्ठाने गोंडस लेकीला जन्म दिला. मुलीचं नाव तिने रुंजी ठेवलं आहे.