Ashneer Grover : -तर मी ‘बिग बॉस’मध्ये जायला तयार..., ‘शार्क टँक इंडिया’ फेम अश्नीर ग्रोव्हरचा खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2022 16:05 IST2022-11-30T16:02:51+5:302022-11-30T16:05:30+5:30
Ashneer Grover : ‘शार्क टँक इंडिया’च्या (Shark Tank India ) पहिल्याच सीझनने लोकप्रियतेचा कळस गाठला होता. या सीझनमधील एक जबरदस्त ‘शार्क’ अर्थात शोचा जज अश्नीर ग्रोव्हरची सर्वाधिक चर्चा झाली होती.

Ashneer Grover : -तर मी ‘बिग बॉस’मध्ये जायला तयार..., ‘शार्क टँक इंडिया’ फेम अश्नीर ग्रोव्हरचा खुलासा
‘शार्क टँक इंडिया’च्या (Shark Tank India ) पहिल्याच सीझनने लोकप्रियतेचा कळस गाठला होता. या सीझनमधील एक जबरदस्त ‘शार्क’ अर्थात शोचा जज अश्नीर ग्रोव्हरची (Ashneer Grover ) सर्वाधिक चर्चा झाली होती. त्याचं बिनधास्त बोलणं, फटकळ वागणं, आवडलं नाही त्यास थेट नकार देणं याचीच सर्वाधिक चर्चा झाली होती. अगदी सोशल मीडियावरही त्याच्यावरच्या मीम्सनी धुमाकूळ घातला होता. स्पष्टवक्तेपणामुळे अश्नीर टीकेचा धनी ठरला होता. परंतु त्याच्या इन्व्हेस्ट करण्याच्या पद्धतीचं अनेक जण कौतुक देखील करायचे. यामुळे अश्नीरचं फॅन फॉलोइंग तयार झालं होतं. अर्थात याच अश्नीरला ‘शार्क टँक इंडिया’च्या दुसऱ्या सीझनमधून वगळण्यात आलं आहे.
अश्नीरने अलीकडे ‘रेड एफएम’ला मुलाखत दिली. यावेळी त्याने अनेक खुलासे केलेत. त्याचा एक खुलासा ऐकून अनेकांच्या भुवया उंचावल्या. होय, मला बिग बॉसची (Bigg Boss) ऑफर आली होती, असं त्याने सांगितलं. अर्थात ही आॅफर मी नाकारली आहे, असंही तो म्हणाला.
मी फक्त याच अटीवर बिग बॉसमध्ये जाईल...
बिग बॉससाठी मला विचारणा झाली होती. पण मी नकार दिला. मी कधीच त्या शोमध्ये पाहू शकणार नाही. माझ्या मते, जे जीवनात अपयशी ठरले तेच त्या शोमध्ये जातात. एकेकाळी मी सुद्धा हा शो पाहायचो, पण आता तो अत्यंत शिळा झाला आहे. त्यांनी मला मध्यंतरी विचारलं होतं, पण मी त्यांना साफ नकार कळवला. अर्थात बिग बॉसच्या निर्मात्यांनी मला सलमान खानपेक्षा जास्त पैसे ऑफर केले तर कदाचित मी शोमध्ये जाण्याबद्दल विचार करेनही, असं अश्नीर म्हणाला.
‘शार्क टँक इंडिया 2’मध्ये तू का नाहीस?
‘शार्क टँक इंडिया’च्या दुसऱ्यासीझनमध्ये अश्नीर नाही, असं का? असं विचारलं असता तो म्हणाला, ‘मला शोचे निर्माते अफोर्ड करू शकत नाहीत. अफोर्ड सिर्फ पैसे से नहीं होता, औकात से भी होता है’ .