शबाना आझमी दिसणार छोट्या पडद्यावर
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2019 21:00 IST2019-02-04T21:00:00+5:302019-02-04T21:00:00+5:30
अमानवी शक्तींवर आधारित आपल्या ‘दिव्य दृष्टी’ या आगामी मालिकेद्वारे प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यास ‘स्टार प्लस’ वाहिनी सज्ज झाली आहे. ‘

शबाना आझमी दिसणार छोट्या पडद्यावर
अमानवी शक्तींवर आधारित आपल्या ‘दिव्य दृष्टी’ या आगामी मालिकेद्वारे प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यास ‘स्टार प्लस’ वाहिनी सज्ज झाली आहे. ‘दिव्य दृष्टी’ ही अंगी विशेष शक्ती असलेल्या दोन बहिणींची कथा आहे. दृष्टीला भविष्यात काय घडणार आहे, ते पाहण्याची शक्ती असते; तर या भविष्यात बदल करण्याची शक्ती दिव्या हिच्याकडे असते! अर्थात कोणतीही विशेष शक्ती असली, तरी त्याबरोबर काही तोटेही येतात आणि या दोन्ही बहिणींना पिशाचिनींपासून धोका असतो.
आता मकडी, मासून, नीरजा यासारख्या अनेक दर्जेदार चित्रपटांमध्ये आपल्या नैसर्गिक आणि शक्तिशाली अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकलेली ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी लवकरच ‘स्टार प्लस’वरील ‘दिव्य दृष्टी’ मालिकेद्वारे आपल्या अभिनयाची जादू टीव्हीवर पसरणार आहे. या मालिकेत ती पाहुण्या कलाकारच्या भूमिकेत दिसणार आहे. ती एका पिशाचिनीच्या आईची भूमिका साकारणार आहे. ही भूमिका लांबीने छोटीच असली, तरी शबानाजी आपल्या दर्जेदार अभिनयाचा प्रत्यय या छोट्या भूमिकेतही देतील, याची आम्हाला खात्री आहे.
दिव्या आणि दृष्टी या बहिणी नियतीच्या खेळामुळे एकमेकींना दुरावलेल्या असतात. त्यामुळे दर पौर्णिमेला त्या एकमेकींच्या शोधासाठी बाहेर पडतात. दृष्टीला नुकताच एक दृष्टांत होतो, ज्यामुळे ती गोंधळात पडते. पिशाचिनीला काय हवे असते? तिला दृष्टीची दैवी शक्ती हवी असते की तिला दृष्टीचा जीव घ्यायचा असतो? हे प्रश्न सध्या तरी अनुत्तरित असल्याने दृष्टीच्या मनात गोंधळ संभ्रम निर्माण झाला आहे. आता आपल्या या लहानशा भूमिकेतही शबानाजी आपल्या अभिनयाची जादू प्रेक्षकांवर फिरवतील, याची आम्हाला खात्री आहे. ‘दिव्य दृष्टी’ लवकरच ‘स्टार प्लस’वर दाखल होणार आहे.