प्राजक्ता माळीच्या हार्महाऊसवर कुटुंबीयांसोबत गेली मराठी अभिनेत्री, एका दिवसाचं भाडं माहितीये का?
By कोमल खांबे | Updated: October 11, 2025 14:43 IST2025-10-11T14:43:09+5:302025-10-11T14:43:31+5:30
प्राजक्ता एक अभिनेत्री असण्यासोबतच निर्माती आणि उद्योजिकादेखील आहे. कर्जतमध्ये प्राजक्ताचं स्वत:चं फार्महाऊसदेखील आहे. एका मराठी अभिनेत्रीने नुकतंच प्राजक्ताच्या या फार्महाऊसला भेट दिली.

प्राजक्ता माळीच्या हार्महाऊसवर कुटुंबीयांसोबत गेली मराठी अभिनेत्री, एका दिवसाचं भाडं माहितीये का?
प्राजक्ता माळी ही मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. अनेक मालिका, सिनेमांमध्ये तिने काम केलं आहे. तर काही वेबसीरिजमध्येही प्राजक्ता झळकली आहे. प्राजक्ता एक अभिनेत्री असण्यासोबतच निर्माती आणि उद्योजिकादेखील आहे. कर्जतमध्ये प्राजक्ताचं स्वत:चं फार्महाऊसदेखील आहे. एका मराठी अभिनेत्रीने नुकतंच प्राजक्ताच्या या फार्महाऊसला भेट दिली.
अभिनेत्री सायली देवधरप्राजक्ता माळीच्या प्राजक्तकुंज या कर्जतमधील फार्महाऊसवर तिच्या कुटुंबीयांसह गेली होती. याचे खास फोटो तिने सोशल मीडियावरुन शेअर केले आहेत. "प्राजक्तकुंजमध्ये अप्रतिम मुक्काम झाला. सुंदर दृश्य, प्रशस्त व्हिला, अप्रतिम जेवण आणि उत्तम सोय धन्यवाद. प्राजक्ता लवकरच एकत्र प्लॅन करूया", असं सायलीने पोस्टमध्ये म्हटलं आहे. सायलीच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंटही केल्या आहेत.
दरम्यान, प्राजक्ताने २०२३ मध्ये कर्जतमध्ये हे फार्महाऊस विकत घेतलं होतं. प्राजक्ताचं हे फार्महाऊस ३ बीएचके आहे. यामध्ये स्विमिंगपूल आणि गार्डन एरियादेखील आहे. रिपोर्टनुसार, प्राजक्ताच्या या फार्महाऊसचं एका दिवसाचं भाडं हे तब्बल ३० हजार इतकं आहे.