'सावळ्याची जणू सावली' मालिकेतील अभिनेत्रींचा रील, प्राप्ती रेडकरसह मेघा धाडेने फॉलो केला ट्रेंड
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2025 13:24 IST2025-01-17T13:24:21+5:302025-01-17T13:24:48+5:30
मेघा, प्राप्ती आणि भाग्यश्री यांनी मिळून इन्स्टावर हा रील बनवला आहे. त्यांच्या या रील व्हिडिओला चाहत्यांचीही पसंती मिळत आहे.

'सावळ्याची जणू सावली' मालिकेतील अभिनेत्रींचा रील, प्राप्ती रेडकरसह मेघा धाडेने फॉलो केला ट्रेंड
'सावळ्याची जणू सावली' या झी मराठी वाहिनीवरील मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची मनं जिंकली. या मालिकेतील सावली प्रेक्षकांना भावली. तर इतर कलाकारांवरही प्रेक्षक प्रेम करतात. या मालिकेतील अभिनेत्रींचा एक रील व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये अभिनेत्रींनी इन्स्टाग्रामवरील ट्रेण्ड फॉलो केला आहे.
'सावळ्याची जणू सावली' मालिकेत अभिनेत्री प्राप्ती रेडकर मुख्य भूमिका साकारत आहे. तर मेघा धाडे खलनायिकेच्या भूमिकेत आहे. मेघा या मालिकेत भैरवी वझे ही भूमिका साकारत आहे. तर अभिनेत्री भाग्यश्री दळवी तारा वझे या व्यक्तिरेखेत दिसत आहे. मेघा, प्राप्ती आणि भाग्यश्री यांनी मिळून इन्स्टावर हा रील बनवला आहे. त्यांच्या या रील व्हिडिओला चाहत्यांचीही पसंती मिळत आहे. ऑन स्क्रीनबरोबरच त्यांची ऑफ स्क्रीन केमिस्ट्री पाहून चाहतेही थक्क झाले आहेत.
प्राप्ती रेडकरसोबत या मालिकेत साईंकित कामत मुख्य नायकाच्या भूमिकेत आहेत. 'सावळ्याची जणू सावली'मध्ये साईंकित सारंग ही भूमिका साकारत आहे. तर सुलेखा तळवलकर तिलोत्तमाच्या भूमिकेत आहेत. 'बिग बॉस मराठी' फेम वीणा जगतापही या मालिकेत खलनायिकेची भूमिका साकारत आहे.