'सावळ्याची जणू सावली' फेम अभिनेत्याचा अपघात, थोडक्यात बचावला; म्हणाला- "रस्त्यावर लाईट नव्हते, एक कुत्रा..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2026 10:19 IST2026-02-10T10:19:05+5:302026-02-10T10:19:38+5:30

लोकप्रिय मराठी अभिनेत्याचा भयानक अपघात घडल्याची माहिती मिळत आहे. या अपघातातून अभिनेता थोडक्यात बचावला असून हा अपघात नेमका कसा घडला? हेदेखील अभिनेत्याने सांगितलं आहे.

savlyachi janu savali fame actor suprit kadam accident shared incident | 'सावळ्याची जणू सावली' फेम अभिनेत्याचा अपघात, थोडक्यात बचावला; म्हणाला- "रस्त्यावर लाईट नव्हते, एक कुत्रा..."

'सावळ्याची जणू सावली' फेम अभिनेत्याचा अपघात, थोडक्यात बचावला; म्हणाला- "रस्त्यावर लाईट नव्हते, एक कुत्रा..."

लोकप्रिय मराठी अभिनेत्याचा भयानक अपघात घडल्याची माहिती मिळत आहे. अभिनेत्याने स्वत: सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्याचा अपघात झाल्याची माहिती दिली आहे. अपघातानंतरचा फोटो अभिनेत्याने शेअर केला आहे. या अपघातातून अभिनेता थोडक्यात बचावला असून हा अपघात नेमका कसा घडला? हेदेखील अभिनेत्याने सांगितलं आहे. अनेक मालिकांमध्ये काम करून प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवणारा अभिनेता सुप्रित कदम याच्यासोबत ही भयंकर घटना घडली आहे. 

सुप्रितने त्याच्या इन्स्टाग्रामवरुन अपघातानंतरचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये त्याच्या हाताला दुखापत झाल्याचं दिसत आहे. "फोटो टाकण्यामागे कारण असं आहे की बांद्रा कार्टर रोडवर ७ फेब्रुवारी २०२६ ला संध्याकाळी ७ वाजता माझा अपघात झाला. रस्त्यवरच्या लाइट्स गेलेल्या आणि एक काळ्या रंगाचा कुत्रा रोड क्रॉस करता करता माझ्या बाईक खाली आला. सांगायचा मुद्दा असा की अपघात मोठा झाला. पण मी थोडक्यात बचावलो माझ्या हेल्मेटमुळे... आपण किती गाडी सेफ चालवत असलो तरी समोरच्या कुठल्याही गोष्टी मुळे असे प्रसंग कधीही येऊ शकतात. हेल्मेटमुळे आपला जीव वाचू शकतो . कृपया करून हेल्मेट कंपल्सरी वापरा", असं म्हणत सुप्रितने अपघात कसा झाला हे सांगितलं आहे. त्याबरोबरच चाहत्यांना हेल्मेट वापरण्याचं आवाहनही केलं आहे.  


सुप्रितच्या पोस्टवर कमेंट करत चाहत्यांनी चिंता व्यक्त केली आहे. तर सेलिब्रिटींनी त्याला काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. अपघातानंतरही सुप्रित नियमित त्याच्या मालिकेच्या शूटिंगला जात होता. सध्या सुप्रित 'सावळ्याची जणू सावली' मालिकेत महत्त्वाची भूमिका साकारत आहे. तर याआधी त्याने 'लग्नाची बेडी', 'नकळत सारे घडले', 'काव्यांजली', 'गुन्ह्याला माफी नाही' या मालिकांमध्ये काम केलं होतं. 'जगावेगळी अंत्ययात्रा' या सिनेमातही त्याने महत्त्वाची भूमिका साकारली होती. 

Web Title : 'सावळ्याची जणू सावली' फेम अभिनेता दुर्घटना में घायल, बाल-बाल बचे।

Web Summary : अभिनेता सुप्रित कदम एक कुत्ते और खराब रोशनी के कारण कार्टर रोड पर बाइक दुर्घटना में बाल-बाल बच गए। उन्हें मामूली चोटें आईं और उन्होंने सभी से सुरक्षा के लिए हेलमेट पहनने का आग्रह किया। कदम कई मराठी टीवी धारावाहिकों में अपनी भूमिकाओं के लिए जाने जाते हैं।

Web Title : 'Savalayachi Janu Savali' fame actor injured in accident, survives narrowly.

Web Summary : Actor Suprit Kadam survived a bike accident on Carter Road due to a stray dog and poor lighting. He sustained minor injuries and urged everyone to wear helmets for safety. Kadam is known for his roles in several Marathi TV serials.