मराठमोळ्या अभिनेत्रीवर भडकला टीव्हीचा श्रीकृष्णा सौरभ जैन, म्हणाला "तुझ्यात सभ्यतेची कमतरता"
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2025 14:41 IST2025-12-21T14:27:56+5:302025-12-21T14:41:43+5:30
महाभारत मालिकेत श्रीकृष्णाच्या भूमिकेतून घराघराच पोहोचलेल्या सौरभ राज जैन याने एका मराठमोळ्या अभिनेत्री सुनावलं आहे.

मराठमोळ्या अभिनेत्रीवर भडकला टीव्हीचा श्रीकृष्णा सौरभ जैन, म्हणाला "तुझ्यात सभ्यतेची कमतरता"
Saurabh Raj Jain Furious on Shilpa Shinde : 'भाभीजी घर पर है' ही टीव्हीवरील सर्वात गाजलेली मालिका. या मालिकेत अंगूरी भाभीच्या भूमिकेने दोन अभिनेत्रींचं नशीब उजळलं. श्वेता शिंदे आणि शुभांगी अत्रे या दोन अभिनेत्री अंगूरी भाभीच्या भूमिकेत दिसल्या. या दोघींनाही प्रेक्षकांनी तितकंच प्रेम दिलं. सुरुवातीला या मालिकेत श्वेता शिंदे अंगूरी भाभीच्या भूमिकेत होती. मात्र वर्षभरातच तिने ही मालिका सोडली होती. त्यानंतर शुभांगी अत्रे 'भाभीजी घर पर है' मालिकेत अंगूरी भाभीची भूमिका साकारत होती. आता १० वर्ष अंगूरी भाभीची भूमिका साकारल्यानंतर शुभांगी अत्रे मालिकेतून एक्झिट घेणार आहे. तर शिल्पा शिंदे 'अंगूरी भाभी' या भूमिकेत परतणार आहे. मात्र, शोच्या प्रीमियरपूर्वीच केलेल्या एका विधानामुळे शिल्पा अडचणीत आली.
शिल्पा शिंदेने एका मुलाखतीत गेल्या १० वर्षांपासून अंगूरी भाभीची भूमिका साकारणाऱ्या शुभांगी अत्रे हिच्यावर टीका केली. शिल्पा म्हणीली की, "शुभांगी एक चांगली अभिनेत्री असेलही, पण विनोद करणं हे प्रत्येकाला येत नाही. दुसऱ्याची नक्कल करणं खूप कठीण आणि तणावपूर्ण असतं". शिल्पाच्या या विधानामुळे सोशल मीडियावर संताप व्यक्त केला जात आहे. कारण शुभांगीने गेली दशकभर हा शो यशस्वीपणे पेलला आहे.
शिल्पाच्या या विधानावर 'महाभारत' फेम अभिनेता सौरभ राज जैन याने इंस्टाग्रामवर एक लांबलचक पोस्ट शेअर करत तिला खडे बोल सुनावले आहेत. शिल्पाचे नाव न घेता सौरभने लिहिले, "मालिकेत रिप्लेस (बदललेल्या) केलेल्या अभिनेत्रीने जवळपास १० वर्षांपर्यंत प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आणि या संपूर्ण प्रवासात प्रेक्षकांनीही तिच्यावर प्रेमाचा वर्षाव केला. आता कोणत्याही कारणास्तव जेव्हा पहिली अभिनेत्री पुन्हा त्याच भूमिकेत परततेय, जी भूमिका तिने दहा वर्षांपूर्वी कोणत्यातरी कारणांसाठी सोडली होती. ती मीडियाला सांगते की बदललेली अभिनेत्री तिच्याइतकी मोठी नाही आणि तिच्यात विनोदाच्या टायमिंगची कमतरता आहे. तर नाही मॅडम, खरं तर तुमच्याकडे मूलभूत सभ्यतेचा अभाव आहे".

सौरभने पुढे असेही म्हटले की, हा प्रसंग माझ्यासाठी आणि सर्वांसाठी एक धडा आहे. "नम्रता ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे, बाकी सर्व काही तात्पुरते आहे" अशा शब्दांत त्याने शिल्पाला आरसा दाखवला. दरम्यान या मालिकेमुळे शिल्पाला प्रेक्षकांची चांगली पसंती मिळाली. शिल्पाची बोलण्याची खास पद्धत, याशिवाय "सही पकडे हैं" हा डायलॉग आणि तिचा साधेपणा यामुळे ही भूमिका खूप गाजली होती. १० वर्षांनंतर शिल्पा पुन्हा एकदा प्रेक्षकांना हसवण्यात यशस्वी होते, की वादातच अडकून राहते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल