दोन महिन्यांत मोडलेला संसार; १२ वर्षांनंतर अभिनेत्री मराठमोळ्या पायलटशी बांधणार लग्नगाठ

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2023 13:20 IST2023-02-02T13:13:33+5:302023-02-02T13:20:05+5:30

या लग्नामुळे दोघांचे कुटुंबीयही खूप खूश आहेत.

Sara khan to marry second time with shantanu raje after painful divorce ali merchant in bigg boss | दोन महिन्यांत मोडलेला संसार; १२ वर्षांनंतर अभिनेत्री मराठमोळ्या पायलटशी बांधणार लग्नगाठ

दोन महिन्यांत मोडलेला संसार; १२ वर्षांनंतर अभिनेत्री मराठमोळ्या पायलटशी बांधणार लग्नगाठ

सारा खान (Sara Khan) आजकाल तिच्या कमबॅकमुळे चर्चेत आहे. ती '1990' या चित्रपटातून कमबॅक करण्यास सज्ज झाली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन शाहिद काझमी करत आहेत. या चित्रपटात सारासोबत अर्जुन मन्हास आणि मीर सरवर यांचा अभिनयही पाहायला मिळणार आहे. साराच्या प्रोफेशनल लाइफनंतर आता तिच्या पर्सनल लाइफशी संबंधित एक बातमी समोर आली आहे. ती तिचा मराठमोळा बॉयफ्रेंड शंतनू राजे ( Shantanu Raje)सोबत लवकरच विवाहबंधनात अडकणार असल्याची चर्चा आहे. शंतनू राजे हा व्यवसायाने पायलट असून एका रेस्टॉरंटचे मालक आहेत.

सारा खान दुस-यांदा वधू बनणार आहे. यापूर्वी 2010 मध्ये तिने 'बिग बॉस 4' च्या घरात स्पर्धक अली मर्चंटसोबत निकाह केला होता. हे लग्न केवळ दोन महिने टिकले. घरातून बाहेर पडल्यानंतर सारा-अली मर्चंटचा घटस्फोट झाला.

मीडिया रिपोर्टनुसार सारा जवळपास दोन वर्षांपासून शंतनू राजेला डेट करते आहे. तिला आता तिच्या नात्यात पुढे जायचे आहे म्हणून तिने लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. शंतनूही साराची कंपनी एन्जॉय करतोय.  शंतनूने सांगितले की, दोघांमध्ये असुरक्षिततेला जागा नाही आणि ते तिच्या भूतकाळाबद्दल कधीच बोलत नाहीत. या वर्षात हे जोडपं त्यांच्या नात्याला पुढे घेऊन जाण्याचा विचार करत आहे. त्याचबरोबर या लग्नामुळे दोघांचे कुटुंबीयही खूप खूश आहेत.

 सारा खान ही प्रसिद्ध मॉडेल आणि अभिनेत्री आहे. तिनं २००७ साली मिस भोपाळ हा किताब जिंकला होता. स्टार प्लसवरील 'सपना बाबूल का...'बिदाई' या मालिकेत तिनं साधनाची भूमिका साकारली असून ती लोकांच्या खूप पसंतीच पडली होती. 'बिदाई' या मालिकेतून घराघरांत पोहोचलेली साराला आजही साधना म्हणूनच चाहते ओळखतात.

Web Title: Sara khan to marry second time with shantanu raje after painful divorce ali merchant in bigg boss