'मी अनेकदा त्याला रंगेहाथ पकडलं, आजही तो', अभिनेत्री सारा खानचा पहिल्या पतीबाबत धक्कादायक खुलासा !

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2022 11:59 IST2022-11-25T11:23:34+5:302022-11-25T11:59:49+5:30

बिग बॉसच्या सेटवर साराने टीव्ही अभिनेता अली मर्चंटशी लग्न केले होतं.

Sara khan opens about her failed marriage Ali Merchant it continues haunt me even today | 'मी अनेकदा त्याला रंगेहाथ पकडलं, आजही तो', अभिनेत्री सारा खानचा पहिल्या पतीबाबत धक्कादायक खुलासा !

'मी अनेकदा त्याला रंगेहाथ पकडलं, आजही तो', अभिनेत्री सारा खानचा पहिल्या पतीबाबत धक्कादायक खुलासा !

Sara Khan Ali Merchant: 'विदाई' या मालिकेतून सारा खान हे नाव घराघरात पोहोचलं. बिग बॉस सारख्या वादग्रस्त रिअ‍ॅलिटी शोचा देखील ती भाग होती. ऐवढचं नाही तर बिग बॉसच्या सेटवर साराने टीव्ही अभिनेता अली मर्चंटशी निकाह केला होता. पण दोन महिन्यांनंतर २०११ मध्ये या दोघांचा घटस्फोटही झाला होता. मात्र अली मर्चंट आजही साराचा पिच्छा सोडत नसल्याचं तिचं म्हणणं आहे.  

अलीकडेच एका मुलाखतीत साराने याविषयी की, त्याने माझी अनेकदा फसवणूक केली, माझ्यासोबत काम करणाऱ्या मुलीसोबत देखील त्याचं अफेअर होते. तिनं आपली चूक मान्य करत माझ्यासमोर सत्य कबूल केलं. मी त्याला अनेकदा रंगेहाथ पकडलं आहे. या सर्व गोष्टी बघूनचं मी पुढे जाण्याचा निर्णय घेतला. मी त्याच्यासोबत खूश नव्हते.

सारा पुढे म्हणाली, अली सोबतचं तिचं संंबंध अजिबात चांगलं नाहीत, त्यामुळे ते आता कधीच मित्र होऊ शकत नाहीत. यासोबतच तिनं अलीला पुढे जाण्याचा सल्लाही दिला. या संदर्भात, तिने खुलासा केला की तो अजूनही जुन्या गोष्टी घेऊन बसला आहे आणि साराला कुठेही भेटला ही तिच्याशी बोलायला येतो. मात्र या सर्व गोष्टी साराला फारशा आवडत नाही. ज्यावेळी हे लग्न झालं त्यावेळी मी खूप लहान होते, मला डोकं नव्हतं. आजही तो माझ्याबद्दल वादाचे मुद्दे शोधत राहतो. तो प्रसिद्धीचा भुकेला माणूस आहे. मला मीडियाच्या कॅमेऱ्यासमोर पाहताच तो तिथे येऊन उभा राहतो.

Web Title: Sara khan opens about her failed marriage Ali Merchant it continues haunt me even today