'सांग तू आहेस का ?' मालिकेतील ही अभिनेत्री अडकली लग्नबेडीत, पाहा तिचे फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2021 11:24 IST2021-12-15T19:58:20+5:302021-12-16T11:24:12+5:30
‘मी माझी गर्लफ्रेंड आणि..’ या युट्युबवरील वेबसिरीजमध्ये भाग्यश्री झळकली होती.

'सांग तू आहेस का ?' मालिकेतील ही अभिनेत्री अडकली लग्नबेडीत, पाहा तिचे फोटो
सध्या बॉलिवूड आणि मराठी सिनेसृष्टीत लगीन घाई सुरु आहे. अभिनेत्री भाग्येश्री दळवी (Bhagyashree dalvi ) अलीकडेच लग्नाच्या बेडीत अडकली आहे. भाग्यश्रीच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. अनेक कलाकारांनी भाग्यश्री आणि प्रतिकला शुभेच्छा दिल्या आहेत. भाग्यश्रीच्या लग्नाला मराठी इंडस्ट्रीतील कलाकारांनी हजेरी लावली. विराजस कुलकर्णी, शिवानी रांगोळे सुलेखा तळवलकर आणि गुरू दिवेकर यांनी या लग्नाला हजेरी लावली होती. लग्नात पिवळ्या रंगाच्या नऊवारी साडीत भाग्यश्री खूपच सुंदर दिसतेय.
.
‘मी माझी गर्लफ्रेंड आणि..’ या युट्युबवरील वेबसिरीजमध्ये भाग्यश्री झळकली होती. भाग्यश्री दळवी हिने सांग तू आहेस का या मालिकेत सिद्धार्थ चांदेकरच्या बहिणीची म्हणजेच दिप्तीची भूमिका साकारली होती. या मालिकेतून भावा बहिणीची जुळून आलेली केमिस्ट्री प्रेक्षकांना खूपच भावली होती.
सांग तू आहेस का या मालिकेत काम करत असतानाच भाग्यश्रीने प्रतीक सोबत मोठ्या थाटात साखरपुडा केला होता. त्यावेळी सिद्धार्थ चांदेकरसह मालिकेच्या कलाकारांची हजेरी लावली होती. भाग्यश्री सोशल मीडियाच्या नेहमीच चाहत्यांच्या संपर्कात असते. आपले फोटो आणि व्हिडीओ ती नेहमी सोशल मीडियावर शेअर करत असते.