नवी मालिका, मुख्य भूमिका! संदीप खरेंची लेकीसाठी खास पोस्ट; म्हणाले, "nonsence प्रश्न..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2024 12:21 IST2024-08-18T12:20:58+5:302024-08-18T12:21:44+5:30

रुमानी खरे 'दुर्गा' मालिकेत दिसणार आहे.

Sandeep Khare shared special post for daughter Roomani her upcoming serial Durga | नवी मालिका, मुख्य भूमिका! संदीप खरेंची लेकीसाठी खास पोस्ट; म्हणाले, "nonsence प्रश्न..."

नवी मालिका, मुख्य भूमिका! संदीप खरेंची लेकीसाठी खास पोस्ट; म्हणाले, "nonsence प्रश्न..."

लोकप्रिय कवी संदीप खरेंची लेक रुमानी खरे (Roomani Khare) आगामी मालिकेत मुख्य भूमिकेत दिसणार आहे. कलर्स मराठीवर येत्या काही दिवसात 'दुर्गा' ही मालिका सुरु होत आहे. यामध्ये दुर्गा ही मुख्य भूमिका रुमानी खरे साकारत आहे. मुख्य भूमिका मिळाल्याने रुमानी आनंदी आहेच पण तिचे वडील संदीप खरे (Sandeep Khare) यांना तिच्याहून जास्त आनंद झालाय. हा आनंद त्यांनी पोस्ट शेअर करत शब्दात मांडला आहे.

संदीप खरेंनी लेकीच्या 'दुर्गा'  या मालिकेचा प्रोमो शेअर करत लिहिले, "लाडक्या लेकीची दुसरी serial.... प्रमुख भूमिका असलेली.... अगदी तिच्या भूमिकेचंच नाव मालिकेला दिलेलं.... 'कसं वाटतंय ' हा अत्यंत nonsense प्रश्न अनेकदा खूप चुकीच्या वेळी विचारला जातो.... मला आत्ता कोणी विचारला तर मला odd नाही वाटणार पण खरं सांगू... शब्दात सांगता येणंही खरंच नाही जमणार !
अगदी परवा पर्यंत तर एवढीशी होती आणि आता मारे shooting, प्रवास, उलट सुलट schedules सगळं सांभाळत आम्हालाच सांगत असते की ' chill, बाबा!"

आणि मग जेव्हा घरी येते तेव्हा सगळं बाजूला ठेवून तशीच धमाल पण करते ! आम्ही आई बाबा... लेकीचं कौतुक वाटणारच.... पण तिच्या पहिल्या ' तू तेव्हा तशी ' या मालिकेपासून आत्ताच्या या प्रोमो पर्यंत साऱ्यांचंच उदंड प्रेम, आशीर्वाद तिला लाभतायत !
या दुसऱ्या मालिकेलाही तुमचे आशीर्वाद, कौतुक तिला लाभेल असा विश्वास आहे ! एक गंम्मत मात्र वाटते....तिच्या शांत, शहाण्या, समंजस स्वभावाला ' दुर्गा ' नाव असलेली भूमिका मिळावी हा योगायोग फारच मजेशीर आहे ! 
मालिका जरूर पहा... तुमचे अभिप्राय महत्वाचे आहेत !"


रुमानीने याआधी 'तू तेव्हा तशी' मालिकेत सहायक अभिनेत्रीची भूमिका साकारली होती. यानंतर आता दुसऱ्या मालिकेत तिला थेट मुख्य भूमिका मिळाली आहे. 

Web Title: Sandeep Khare shared special post for daughter Roomani her upcoming serial Durga