लोकप्रिय मराठी अभिनेत्री रुमानीचा पार पडला साखरपुडा, संदीप खरेंचा होणारा जावई कोण?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2025 09:46 IST2025-12-14T09:43:32+5:302025-12-14T09:46:15+5:30
संदीप खरे यांचा होणार जावई हा एक अभिनेता आहे.

लोकप्रिय मराठी अभिनेत्री रुमानीचा पार पडला साखरपुडा, संदीप खरेंचा होणारा जावई कोण?
सध्या मराठी सिनेविश्वात लगीनघाई सुरू आहे. एकामागोमाग एक सेलिब्रिटी लग्नाच्या बेडीत अडकत आहेत. प्राजक्ता गायकवाड, पूजा बिरारी, भाग्यश्री न्हालवे यांच्यानंतर आणखी एक अभिनेत्री लग्नबंधनात अडकणार आहे. ही अभिनेत्री टीव्ही इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. प्रसिद्ध कवी व गीतकार संदीप खरेंची लाडकी लेक रुमानी खरे ही लवकरच बोहल्यावर चढणार आहे. काल १३ डिसेंबर रोजी रुमानीचा साखरपुडा थाटामाटात पार पडला आहे.
संदीप खरे यांचा होणार जावई हा एक अभिनेता आहे. रुमानीने लोकप्रिय अभिनेता स्तवन शिंदेसह साखरपुडा केला आहे. स्तवन शिंदे याने सोशल मीडियावर साखरपुड्याचे सुंदर फोटो शेअर केले आहेत. या फोटोंवर चाहते आणि मराठी कलाकारांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे.
रुमानीने 'तू तेव्हा तशी' या मालिकेद्वारे अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं होतं. यानंतर रुमानी दुर्गा मालिकेत झळकली. या मालिकेत तिने एक पत्रकार तरूणीचं पात्र साकारलं होतं. तर स्तवन शिंदेनं आजवर अनेक मराठीसह हिंदी मालिकांमध्येही काम केलं आहे. तो स्टार प्रवाहच्या 'तुमचं आमचं सेम असतं' या मालिकेत झळकला होता. 'जय भवानी जय शिवाजी’ या मालिकेतही त्यानं काम केलं होतं. याशिवाय त्याने 'पार्टी', 'क्लास ऑफ ८३' या सिनेमांमध्येही काम केलं आहे. आता रुमानी आणि स्तवन यांच्या लग्नासाठी चाहते उत्सुक आहेत.