नवी गोष्ट, नवी जोडी! लवकरच सुरु होणार समृद्धी केळकरची 'हळद रुसली, कंकू हसलं' मालिका; जाणून घ्या तारीख अन् वेळ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2025 13:23 IST2025-06-14T13:14:19+5:302025-06-14T13:23:07+5:30

नवी गोष्ट, नवी जोडी! लवकरच सुरु होणार समृद्धी केळकरची 'हळद रुसली, कंकू हसलं' मालिका; जाणून घ्या तारीख अन् वेळ

samruddhi kelkar and abhishek rahalkar new serial halad rusli kunku hasala know about the date and time  | नवी गोष्ट, नवी जोडी! लवकरच सुरु होणार समृद्धी केळकरची 'हळद रुसली, कंकू हसलं' मालिका; जाणून घ्या तारीख अन् वेळ 

नवी गोष्ट, नवी जोडी! लवकरच सुरु होणार समृद्धी केळकरची 'हळद रुसली, कंकू हसलं' मालिका; जाणून घ्या तारीख अन् वेळ 

Hald Rusli Kunku Hasala : छोट्या पडद्यावर वेगवेगळ्या विषयांवर आधारित नव्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जुन्या मालिकांच्या जागी नवीन मालिका घेऊन येत निर्मात्यांनी वेगळे विषय हाताळण्याचा प्रयत्न केला आहे. अशातच मागील काही दिवसांपासून मराठी मालिकाविश्वात एका मालिकेची जोरदार चर्चा सुरु आहे. ही मालिका म्हणजे हळद रुसली, कुंकू हसलं.  लोकप्रिय अभिनेत्री समृद्धी केळकर आणि अभिनेता अभिषेक रहाळकर ही फ्रेश जोडी प्रेक्षकांना या मालिकेत पाहायला मिळणार आहेत. अलिकडेच या बहुचर्चित मालिकेचा प्रोमो शेअर करण्यात आला होता. हा प्रोमो पाहून चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. त्याचबरोहर ही मालिका कधी प्रसारित होणार याबद्दल जाणून घेण्यास प्रेक्षक  आतुर होते. याच संदर्भात एक महत्वाची अपडेट समोर आली आहे. 


स्टार प्रवाह वाहिनीवर गेल्या काही महिन्यांमध्ये नव्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आल्या. त्यात आता 'हळद रुसली, कुंकू हसलं' या मालिकेची भर पडली आहे. ती अस्सल गावरान,तो पक्का शहरी मुलाची हटके कहाणी यामध्ये पाहायला मिळणार आहे. समृद्धी केळकर आणि अभिषेक रहाळकर या मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यास सज्ज झाले आहेत. 

कधी होणार प्रसारित?

हळद रुसली कुंकू हसलं मालिका येत्या ७ जुलै पासून दुपारी एक वाजता स्टार प्रवाह वाहिनीवर प्रसारित केली जाणार असल्याची माहिती मिळते आहे. त्यामुळे मालिका रसिकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.दरम्यान, फुलाला सुगंध मातीचा मालिकेतून घराघरात पोहोचलेली समृद्धी केळकर आणि मन धागा धागा जोडते नवा फेम अभिषेक रहाळकर हे कलाकार या मालिकेत मुख्य भूमिकेत आहेत. त्यामुळे आता कोणती मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 

Web Title: samruddhi kelkar and abhishek rahalkar new serial halad rusli kunku hasala know about the date and time 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.