समीर चौघुलेंच्या ‘उंदीर मांजर पकडेंगो’चं नवं व्हर्जन ऐकलंत? ‘कोकण कलेक्टीव्ह गर्ल्स’नाही हसू आवरेना!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2023 13:02 IST2023-10-10T13:00:39+5:302023-10-10T13:02:23+5:30
'उंदीर मांजर पकडिंगो' या गाण्याने अख्ख्या महाराष्ट्राला भुरळ घातली आहे.

समीर चौघुलेंच्या ‘उंदीर मांजर पकडेंगो’चं नवं व्हर्जन ऐकलंत? ‘कोकण कलेक्टीव्ह गर्ल्स’नाही हसू आवरेना!
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या लोकप्रिय विनोदी कार्यक्रमाची प्रेक्षकांमध्ये तुफान क्रेझ आहे. यातील प्रत्येक कलाकाराने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. समीर चौघुले हे त्यापैकीच एक. हास्यजत्रेच्या टीममध्ये समीर चौघुले (Samir Choughule) हे सर्वात अनुभवी कलाकार आहेत. शिवाय ते लेखकही आहेत. त्यांनी स्वत:च अनेक स्किट्स लिहिले आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांचं 'उंदीर मांजर पकडिंगो' गाणं भलतंच व्हायरल झालं होतं.
'उंदीर मांजर पकडिंगो' या गाण्याने अख्ख्या महाराष्ट्राला भुरळ घातली आहे. आता कोकण कलेक्टिव्ह गर्ल्स हे पेज चालवणाऱ्या मुलींनाही या गाण्याचा मोह आवरला नाही. 'जिया जले' या गाण्यावर त्यांनी परफॉर्म केले. तर मागे लपलेले समीर चौघुले यांनी संधी साधत 'उंदीर मांजर पकडिंगो' गायला सुरुवात केली. हे ऐकून कोकण कन्यांनाही हसू आवरेना.
कोकण कलेक्टिव्ह गर्ल्स नावाने पाच मुलींनी मिळून सुरु केलेलं पेज आहे. यामध्ये या पाचही जणी मिळून अगदी सुरात गातात. त्यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. नुकतंच त्यांनी महाराष्ट्राची हास्यजत्रामध्ये हजेरी लावली. यावेळी समीर चौघुले यांच्यासोबत कोकण कलेक्टिव्ह गर्ल्सने हा मजेशीर व्हिडिओ बनवला.