दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर समय रैनानं घेतली आलिशान कार, किंमत कोटींच्या घरात!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2025 14:03 IST2025-10-19T14:01:35+5:302025-10-19T14:03:55+5:30
समय रैनानं दिवाळीच्या मुहुर्तावर महागडी कार घरी आणली आहे.

दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर समय रैनानं घेतली आलिशान कार, किंमत कोटींच्या घरात!
दिवाळीचा सण म्हणजे केवळ दिव्यांची रोषणाई नव्हे, तर तो खरेदीचा उत्सव असतो. दसऱ्यानंतर खरेदीचा उत्साह विशेष वाढतो आणि अनेक जण या शुभ मुहूर्तावर नव्या गोष्टींची खरेदी करून सण साजरा करतात. घर, नवी वस्तू किंवा वाहनांची खरेदी करून अनेक जण दिवाळीचा आनंद द्विगुणित करतात. यंदाही अनेक सेलिब्रिटींनी दिवाळीनिमित्त मोठी खरेदी केली आहे.स्टँड-अप कॉमेडीच्या विश्वात आपल्या हटके शैलीने प्रेक्षकांना हसवणारा लोकप्रिय कॉमेडियन समये रैना (Samay Raina) यानेही यंदा दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर स्वतःला एक खास भेट दिली आहे. समये रैनानं एक आलिशान आणि महागडी कार खरेदी केली आहे.
धनत्रयोदशीच्या शुभ मुहूर्तावर रैनाने करोडो रुपयांची महागडी कार खरेदी केली असून त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये समये कुटुंबही दिसत आहे. सम्य रैनाने टोयोटा वेलफायर (Toyota Vellfire) ही आलिशान एमपीव्ही गाडी घरी आणली. भारतात या कारची किंमत अंदाजे १.३ कोटी इतकी आहे. त्याने शेअर केलेल्या फोटोंमध्ये समय हा शोरूममध्ये कुटुंबासह कारसोबत पोज देताना दिसत आहे.
विशेष म्हणजे, बॉलिवूडमधील अनेक स्टार्सकडे हीच आलिशान कार आहे. नुकतीच क्रिती सॅननने देखील ही कार खरेदी केली होती. तसेच, संजय कपूर, आमिर खान, अक्षय कुमार, अजय देवगण, कियारा अडवाणी आणि आयुष्मान खुराना यांच्यासह अनेक बड्या कलाकारांच्या ताफ्यात या 'टोयोटा वेलफायर'चा समावेश आहे.

सम्य रैनाची कमाई किती?
सम्य रैना हा कॉमेडियन म्हणून खूप यशस्वी आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, समय रैना दरमहा सुमारे १.५ कोटी रुपये कमवतो. त्याची कमाई प्रामुख्याने त्याच्या YouTube चॅनेलवर आधारित आहे, ज्यामध्ये जाहिराती आणि सबस्क्राइबर्सचा समावेश आहे. याशिवाय, तो त्याच्या शोमधून कमावतो. ब्रँड प्रमोशनल कंटेंट आणि ब्रँड एंडोर्समेंट हे देखील समयच्या उत्पन्नाचे स्रोत आहेत. त्यांची एकूण संपत्ती सुमारे १४० कोटी रुपये असण्याचा अंदाज आहे.