Saloni Daini Now: बाबो! 'कॉमेडी सर्कस'च्या 'गंगुबाई'चा हा अवतार पाहून थक्क व्हाल, पाहा ट्रान्सफाॅर्मेशनचा व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2023 10:18 IST2023-04-09T10:16:40+5:302023-04-09T10:18:17+5:30

Saloni Daini Now: तेव्हाची ती गोलमटोल गंगुबाई आता मोठी झाली आहे. केवळ इतकंच नाही तर कमालीची ग्लॅमरस दिसू लागली आहे. आता तिला ओळखणंही कठीण झालं आहे. तिचं ट्रान्सफाॅर्मेशन पाहून तुम्हीही थक्क व्हाल.

saloni daini transformation gangubai loose 22 kgs in 3 years | Saloni Daini Now: बाबो! 'कॉमेडी सर्कस'च्या 'गंगुबाई'चा हा अवतार पाहून थक्क व्हाल, पाहा ट्रान्सफाॅर्मेशनचा व्हिडीओ

Saloni Daini Now: बाबो! 'कॉमेडी सर्कस'च्या 'गंगुबाई'चा हा अवतार पाहून थक्क व्हाल, पाहा ट्रान्सफाॅर्मेशनचा व्हिडीओ

छोट्या पडद्यावरची गंगुबाई तुम्हाला आठवत असेलच. होय, आम्ही बोलतोय ते छोट्या पडद्यावर छोटी गंगुबाई या नावाने लोकप्रिय झालेली बालकलाकार सलोनी दैनी (Saloni Daini) हिच्याबद्दल. कॉमेडी सर्कस या कॉमेडी शोमध्ये गंगुबाईचं पात्र साकारून सलोनी घराघरात पोहोचली होती. तेव्हाची ती गोलमटोल गंगुबाई आता मोठी झाली आहे. केवळ इतकंच नाही तर कमालीची ग्लॅमरस दिसू लागली आहे. आता तिला ओळखणंही कठीण झालं आहे. तिचं ट्रान्सफाॅर्मेशन पाहून तुम्हीही थक्क व्हाल.

सोशल मीडियावर प्रचंड ॲक्टिव्ह असलेली सलोनी काही दिवसांपूर्वीच चर्चेत आली होती. स्वत:चे काही ग्लॅमरस फोटो तिने शेअर केले होते. आता तिने तिच्या ट्रान्सफाॅर्मेशनचा व्हिडीओ शेअर केला आहे. गेल्या तीन वर्षात झालेले बदल तिने या व्हिडीओत दाखवले आहेत.
सलोनीने २२ किलो वजन कमी केलं आहे आणि ती खूपच स्लीम अँड ट्रीम दिसते आहे. एका मुलाखतीत ती यावर बोलली होती. माझं वजन ८० किलो झालं होतं. यानंतर मी वजन घटवण्याचा निर्णय घेतला. आता माझं वजन ५८ किलो आहे. लॉकडाऊन काळात मी यासाठी प्रचंड घाम गाळला, असं ती म्हणाली होती. सलोनी दैनी खऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आणि ग्लॅमरस असून तिचा हा अंदाज तिच्या चाहत्यांना खूप भावतो आहे.

सलोनी दैनीनं २००८ साली 'छोटे मिया' या लहान मुलांच्या कॉमेडी शोमधून छोट्या पडद्यावर पदार्पण केलं होते. या शोमध्ये ती गंगूबाई हे पात्र साकारायची. तिची ही व्यक्तिरेखा त्यावेळी खूप गाजली होती. आजही ती छोटी गंगूबाई म्हणूनच ओळखली जाते. त्यानंतर तिने 'रावी', 'नमुने', 'बडे भैया की दुल्हनिया', 'तेडी मेढी फॅमेली', यह जादू है जिन्न का’ या मालिकेत काम केलं. 

Web Title: saloni daini transformation gangubai loose 22 kgs in 3 years