फरहाना भटला सलमान खानने दिली ताकीद; नेटकरी बाजू घेत म्हणाले, "कोणता शो पाहून आलाय..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2025 17:48 IST2025-10-25T17:47:54+5:302025-10-25T17:48:38+5:30
फरहानाा टार्गेच केल्यानंतर चाहत्यांनी सलमानलाच धारेवर धरलं

फरहाना भटला सलमान खानने दिली ताकीद; नेटकरी बाजू घेत म्हणाले, "कोणता शो पाहून आलाय..."
बिग बॉस १९ मध्ये फरहाना भटची चांगलीच चर्चा असते. तिच्या एकंदर व्यक्तिमत्वाचं, स्वॅगचं नेटकरी कौतुक करतात. मराठमोळा प्रणित मोरे तर कायम त्याच्या कॉमेडी मध्ये फरहानावर जोक करत असतो. कधी कधी फरहाना सदस्यांच्या नाकीनऊ आणते. आता तर ती सलमानच्या रागाला बळी पडली आहे. 'वीकेंड का वार'मध्ये सलमान फरहानाची चांगलीच शाळा घेणार आहे.
फरहान भटने एका एपिसोडमध्ये नीलमला 'नाचने वाली' असं म्हटलं होतं. यावरुन आता सलमान फरहानाची खरडपट्टी काढणार आहे. इतकंच नाही तर तिला मर्यादा न ओलांडण्याचा इशाराही देणार आहे. बिग बॉसच्या नवीन प्रोमोमध्ये सलमान 'दोस्त दोस्त ना रहा' गाणं गातो. नंतर तो नीलमला म्हणतो की इतर लोक तुझ्या आणि तान्याच्या भांडणात आपली पोळी भाजून घेत आहेत. असं का होतंय माहित आहे का? पोळी भाजायला तुम्ही स्वत:च चूल पेटवली. यानंतर सलमान फरहानाला म्हणतो, 'लोकांना ोक करणं हे तुझं सर्वात मोठं टॅलेंट आहे. नाचनेवाली हा जो बॉम्ब टाकलाय ना तू...' सलमानचं वाक्य पूर्ण होण्याआधीच फरहाना हसते. मग सलमान भडकतो आणि तिला मर्यादा न ओलांडण्याची ताकीद देतो.' सलमानची रिअॅक्शन पाहून सगळेच चिडीचूप बसतात.
या व्हिडीओवर फरहानाच्या चाहत्यांनी तिची बाजू घेतली आहे. 'फरहानाने कोणती लाईन क्रॉस केली?', 'फरहाना कधीच नाचने वाली असं म्हणाली नव्हती. कुनिकाच्या इशाऱ्यांवर नाचते असं ती म्हणाली होती', 'फरहाना नाचने वाली असं कधी बोलली बिग बॉस? हा काय प्रोमो आहे..सलमान कोणता शो पाहतोय?' अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत.
दरम्यान बिग बॉस १९ मध्ये या आठवड्यात नेहल, बसीर अली, प्रणित मोरे आणि गौरव खन्ना नॉमिनेट झाले आहेत. यातील नेहल आणि बसीर दोघांनाही वोटिंग नंतर बाहेर काढण्यात आलं आहे. बसीरला बाहेर काढल्याने सोशल मीडियावर नाराजीचा सूर उमटला आहे.