Bigg Boss 16 : काऊंटडाऊन सुरू ! ‘या’ दिवशी सुरू होतोय ‘बिग बॉस 16’

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2022 13:54 IST2022-09-01T13:54:09+5:302022-09-01T13:54:33+5:30

Bigg Boss 16 : ‘बिग बॉस’चे फॅन असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. शो कधी सुरू होणार? खुलासा झाला...

salman khan show bigg boss 16 to launch on this date | Bigg Boss 16 : काऊंटडाऊन सुरू ! ‘या’ दिवशी सुरू होतोय ‘बिग बॉस 16’

Bigg Boss 16 : काऊंटडाऊन सुरू ! ‘या’ दिवशी सुरू होतोय ‘बिग बॉस 16’

तुम्ही ‘बिग बॉस’चे फॅन असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. होय, ‘बिग बॉस’चा 16 वा सीझन (Bigg Boss 16 ) येणार म्हटल्यावर चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. पण अद्याप हा शो कधी सुरू होणार, याचे डिटेल्स आले नव्हते. पण आता त्याचाही खुलासा झाला आहे.
टेलिचक्करने दिलेल्या वृत्तानुसार, ‘बिग बॉस 16’ला एक संभाव्य रिलीज डेट मिळाली आहे. आत्तापर्यंतच्या रिपोर्टनुसार, हा शो 1 ऑक्टोबरपासून सुरू होणार, अशी चर्चा होती. पण आता ताज्या रिपोर्टनुसार, देशातील हा सर्वात मोठा रिअ‍ॅलिटी शो 8 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. अर्थात अद्याप तशी अधिकृत घोषणा झालेली नाही. या बातमीत किती तथ्य आहे, ते लवकर कळेलच. पण तूर्तास ‘बिग बॉस 16’च्या चाहत्यांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. 

यंदा बिग बॉसच्या घरात कोण कोण जाणार? ‘बिग बॉस 16’ची थीम काय असणार? असं सगळं जाणून घेण्यास चाहते उत्सुक आहेत. तुम्हाला ठाऊक झालं असेलच की, यंदा ‘बिग बॉस 16’ची अ‍ॅक्वा थीम असणार आहे. नेहमीप्रमाणे सलमान खान (Salman Khan) हाच शोचा होस्ट असणार आहे.
यंदा ‘बिग बॉस 16’मध्ये कोण जाणार, याची उत्सुकता सर्वांनाच आहे. तूर्तास राजीव सेन, चारू असोपा, मुनव्वर फारूखी, जन्नत जुबैर, फैसल शेख यांची नावं चर्चेत आहेत.

यंदा ‘बिग बॉस ओटीटी’ नाही
चाहते ‘बिग बॉस ओटीटी’ची देखील प्रतीक्षा करत आहेत. पण यावेळी ओटीटीवर हा शो येणार नाही. कदाचित पुढील वर्षी मार्च वा एप्रिलमध्ये बीबी ओटीटी सुरू होऊ शकते. अर्थात अद्याप याबद्दल कुठलीही माहिती नाही. गेल्या वर्षीचं बीबी ओटीटी दिव्या अग्रवालने जिंकलं होतं. मात्र अनेकांनी ओटीटी व्हर्जन बोरिंग असल्याचं म्हटलं होतं.  
 

Web Title: salman khan show bigg boss 16 to launch on this date