बिग बॉस १२ चे सूत्रसंचालन करण्यासाठी कॅटरिना कैफने मागितले होते इतके मानधन
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2018 13:11 IST2018-09-06T13:09:43+5:302018-09-06T13:11:03+5:30
Bigg Boss 12: बिग बॉस १२ या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सलमानसोबत कॅटरिना करणार अशा बातम्या गेल्या कित्येक दिवसांपासून मीडियात येत होत्या. या अफवा दुसरं कोणीही नाही तर कॅटरिनानेच पसरवल्या असल्याचे सलमानचे म्हणणे आहे.

बिग बॉस १२ चे सूत्रसंचालन करण्यासाठी कॅटरिना कैफने मागितले होते इतके मानधन
बिग बॉस या कार्यक्रमाचा नवा सिझन म्हणजेच बिग बॉस १२ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या कार्यक्रमाच्या यंदाच्या सिझनचे देखील सूत्रसंचालन सलमान खान करणार आहे. पण तुम्हाला माहीत आहे का, सलमानसोबत या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एक अभिनेत्री करणार असल्याची गेल्या कित्येक दिवसांपासून चर्चा होती. ही अभिनेत्री दुसरी कोणीही नसून कॅटरिना कैफ आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करण्याची कॅटरिनाची इच्छा होती असे नुकतेच सलमानने बिग बॉस या कार्यक्रमाच्या पत्रकार परिषदेत सांगितले.
बिग बॉस १२ या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सलमानसोबत कॅटरिना करणार अशा बातम्या गेल्या कित्येक दिवसांपासून मीडियात येत होत्या. या अफवा दुसरं कोणीही नाही तर कॅटरिनानेच पसरवल्या असल्याचे सलमानचे म्हणणे आहे. सलमानने या पत्रकार परिषदेत सांगितले की, कॅटरिनाला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करण्याची इच्छा होती. पण काही कारणामुळे हे शक्य झाले नाही. त्यामुळे यंदाच्या सिझनमध्ये प्रेक्षकांना सूत्रसंचालकाच्या भूमिकेत केवळ मलाच पाहायला मिळणार आहे. कॅटरिनाला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करायचे आहे, असे तिने मला ज्यावेळी सांगितले होते. त्यावेळी तू या कार्यक्रमात काय करणार आहेस असा प्रश्न मी तिला विचारला होता. त्यावर या कार्यक्रमाच्या स्क्रिप्टनुसार मी काम करेन. तसेच तुला फॉलो करेन. केवळ तुझ्या इतकेच मानधन मला मिळाले पाहिजे असे तिने मला सांगितले होते.
बिग बॉसचा १२ वा सिझन १६ सप्टेंबरपासून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. नुकताच या शोचा लॉचिंग सोहळा गोव्यात पार पडला. सलग नवव्या सिझनचा होस्ट म्हणून परत येण्याविषयी बोलताना, सुपरस्टार सलमान खानने सांगितले, “बिग बॉस या कार्यक्रमाकडे देश तर अपेक्षेने पाहतोच आहे पण मी सुद्धा त्याच समान उत्सुकतेच्या अपेक्षने पाहतोय. जरी मी आठ वर्षांपासून या कार्यक्रमाचे होस्टिंग करत असलो तरी प्रत्येक वेळी मला त्यातून नवीन अनुभव मिळतो आणि मी काही नवीन संबंध जोडतो. विचित्र जोडी ही संकल्पना अतिशय विलक्षण आहे आणि आम्ही निवडलेल्या अफाट जोड्या प्रेक्षकांचे नक्कीच मनोरंजन करतील. या जोड्या एकमेकांच्या सोबत आहेत की कठीण काळात त्यांच्यात कटुता निर्माण झाली आहे हे पाहणे गंमतीदार असणार आहे.”