"मी अनेक मुलींना फिरवायचो, त्यामुळे...", गौहर खानसोबत साखरपुडा मोडल्यानंतर साजिद खानने दिलेली कबुली

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2025 13:24 IST2025-05-25T13:23:43+5:302025-05-25T13:24:37+5:30

साजिद खानसोबत झाला होता गौहर खानचा साखरपुडा, लग्नही होणार होतं पण...; अभिनेत्याच्या अफेअरमुळे झालं ब्रेकअप

sajid khan and gauhar khan wanted to marry each other actors affair break engagement | "मी अनेक मुलींना फिरवायचो, त्यामुळे...", गौहर खानसोबत साखरपुडा मोडल्यानंतर साजिद खानने दिलेली कबुली

"मी अनेक मुलींना फिरवायचो, त्यामुळे...", गौहर खानसोबत साखरपुडा मोडल्यानंतर साजिद खानने दिलेली कबुली

गौहर खान हा हिंदी टेलिव्हिजनचा लोकप्रिय चेहरा आहे. अनेक मालिकांसोबतच काही सिनेमांमध्येही ती झळकली आहे. 'बिग बॉस ७'ची ती विनर होती. करिअरसोबतच पर्सनल लाइफमुळेही गौहर खान चर्चेत होती. गौहर खानचा साखरपुडा बॉलिवूड दिग्दर्शक आणि अभिनेता साजिद खानसोबत झाला होता. त्यांचं लग्नही होणार होतं. मात्र अभिनेत्यामुळे त्यांचं ब्रेकअप झालं. खुद्द साजिद खाननेच याची कबुली दिली होती. 

साजिद खानने एका मुलाखतीत याचा खुलासा केला होता. "आम्ही एक वर्ष एकत्र होतो. ती एक चांगली मुलगी आहे. मी कोणत्याही मुलीचं असं शोमध्ये नाव घेत नाही. पण, आमचा साखरपुडा झाला होता आणि मीडियामध्येही ही गोष्ट आली होती. माझं कॅरेक्टर तेव्हा चांगलं नव्हतं. मी अनेक मुलींसोबत फिरायचो आणि त्यांच्याशी खोटं बोलायचो. मी प्रत्येक मुलीला आय लव्ह यू म्हणायचो आणि प्रत्येकीला माझ्याशी लग्न करशील का? असं विचारायचो. माझी आत्तापर्यंत ३५० लग्न व्हायला हवी होती. पण, नाही झाली. जेवढ्या मुलींसोबत मी रिलेशनशिपमध्ये होतो तेवढ्या मुली मला मिस करत असतील आणि मला शिव्याही देत असतील", असं साजिद खान म्हणाला होता. 

साजिद खानसोबत साखरपुडा मोडल्यानंतर गौहर खानने रिएलिटी शोमध्ये पाऊल ठेवलं. ती 'बिग बॉस ७'ची विनर होती. यादरम्यानच तिची कुशाल टंडनसोबत रेशीमगाठ जुळली. मात्र 'बिग बॉस' संपल्यानंतर त्यांचं ब्रेकअप झालं. त्यानंतर गौहर खानने जेद दरबारसोबत लग्न करत संसार थाटला. त्यांना जेहान नावाचा एक मुलगा आहे. तर आता गौहर खान दुसऱ्यांदा आई होणार आहे. 

Web Title: sajid khan and gauhar khan wanted to marry each other actors affair break engagement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.