इतकी मोठी झाली सई लोकूरची लेक, गणेशोत्सवानिमित्त शेअर केले खास फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2025 12:17 IST2025-08-28T12:17:23+5:302025-08-28T12:17:58+5:30
मराठी आणि हिंदी कलाकारांच्या घरीही यंदा बाप्पा विराजमान झाले आहे. अभिनेत्री सई लोकूरच्या घरीदेखील बाप्पाचं आगमन झालं आहे. सईने गणेशोत्सवाचे खास फोटो शेअर केले आहेत.

इतकी मोठी झाली सई लोकूरची लेक, गणेशोत्सवानिमित्त शेअर केले खास फोटो
घरोघरी बाप्पाचं आगमन झालं आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेशोत्सव मोठ्या धूमधडाक्यात साजरा होत आहे. अनेक सेलिब्रिटीही दरवर्षी मोठ्या उत्साहाने गणेशोत्सव साजरा करतात. मराठी आणि हिंदी कलाकारांच्या घरीही यंदा बाप्पा विराजमान झाले आहे. अभिनेत्री सई लोकूरच्या घरीदेखील बाप्पाचं आगमन झालं आहे. सईने गणेशोत्सवाचे खास फोटो शेअर केले आहेत.
सई लोकूर दरवर्षी गणेशोत्सव साजरा करते. यंदाही तिच्या घरी बाप्पा विराजमान झाले आहेत. काही फोटोंमधून अभिनेत्रीने तिच्या घरच्या बाप्पाचं दर्शन चाहत्यांना घडवलं आहे. गणरायाची सुंदर मूर्तीसोबत सईने बाप्पासाठी खास सजावटही केली आहे. सईने कुटुंबीयांसोबतचे फोटोही शेअर केले आहेत. यामध्ये तिच्या लेकीची झलक पाहायला मिळत आहे.
सईने २०२० मध्ये तिर्थदीप रॉयशी लग्न केलं होतं. लग्नानंतर ३ वर्षांनी सई आणि तिर्थदीप आईबाबा झाले. सईच्या लेकीचं नाव ताशी असं आहे. ताशी आता दीड वर्षांची झाली आहे. दरम्यान, सईने काही मालिका आणि सिनेमांमध्ये काम केलं. पण, तिला हवी तशी प्रसिद्धी मिळाली नाही. सध्या सई सिनेसृष्टीपासून दूर आहे.