सहकुटुंब सहपरिवार: सत्य समोर आल्यानंतर ओमकार करणार आत्महत्या?
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2023 16:42 IST2023-06-21T16:41:28+5:302023-06-21T16:42:05+5:30
Sahkutumb sahaparivar : ओमकारचं सत्य समजल्यानंतर काय असेल मोरे कुटुंबाचा निर्णय?

सहकुटुंब सहपरिवार: सत्य समोर आल्यानंतर ओमकार करणार आत्महत्या?
छोट्या पडद्यावर सध्या गाजत असलेली मालिका म्हणजे ‘सहकुटुंब सहपरिवार’ (Sahkutumb Sahaparivar ). या मालिकेतील प्रत्येक कलाकाराने प्रेक्षकांच्या मनात हक्काचं स्थान निर्माण केलं. सुनील बर्वे, किशोरी अंबिये, कोमल कुंभार, नंदिता पाटकर या मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिका साकारत असून दिवसेंदिवस ही मालिका रंजक वळणावर येत आहे. यामध्येच आता मालिकेत मोठा ट्विस्ट येणार आहे.
सध्या सोशल मीडियावर या मालिकेचा एक प्रोमो व्हायरल होत आहे. या प्रोमोमध्ये ओमकारचं सत्य मोरे कुटुंबासमोर येणार आहे. त्यामुळे कुटुंबाच्या नजरेतून पडल्यामुळे ओमकार प्रचंड ओशाळला आहे. यामध्येच तो मोठं पाऊल उचलणार आहे. ओमकार आत्महत्या करणार आहे.
दरम्यान, ओमकारचं सत्य समजल्यानंतर सुर्या, पशाला माफ करुन घरात घेतील का? ओमकारला कोणती शिक्षा मिळेल? आत्महत्येपासून त्याला रोखलं जाईल? अशा कितीतरी प्रश्नांची उत्तरं प्रेक्षकांना मालिका पाहिल्यावर मिळणार आहेत.