सहकुटुंब सहपरिवार: झालेल्या अपमानाचा पश्या करणार परतफेड; अस्खलित इंग्रजी बोलून सगळ्यांना करणार थक्क

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2022 17:45 IST2022-01-07T17:45:00+5:302022-01-07T17:45:00+5:30

sahkutumb sahaparivar: या मालिकेत गेल्या काही दिवसांपासून  अंजी आणि पश्या यांच्यात गैरसमज निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे. पश्या अशिक्षित असल्यामुळे अंजी कायम त्याचा पाणउतारा करते.

sahkutumb sahaparivar tv serial new twist pasha fluently speak in english | सहकुटुंब सहपरिवार: झालेल्या अपमानाचा पश्या करणार परतफेड; अस्खलित इंग्रजी बोलून सगळ्यांना करणार थक्क

सहकुटुंब सहपरिवार: झालेल्या अपमानाचा पश्या करणार परतफेड; अस्खलित इंग्रजी बोलून सगळ्यांना करणार थक्क

स्टार प्रवाहवरील 'सहकुटुंब सहपरिवार' ही मालिका सध्याच्या घडीला लोकप्रिय मालिकांपैकी एक असल्याचं पाहायला मिळतं. या मालिकेतील प्रत्येक कलाकाराने आपल्या अभिनयाच्या जोरावर आपली भूमिका जिवंत केली आहे. त्यामुळे सूर्या, सरु, अंजी, पश्या, अवनी आणि वैभव ही पात्र प्रेक्षकांना आपल्यातील वाटतात. या मालिकेत गेल्या काही दिवसांपासून  अंजी आणि पश्या यांच्यात गैरसमज निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे. पश्या अशिक्षित असल्यामुळे अंजी कायम त्याचा पाणउतारा करते. इतकंच नाही तर त्याला कायम अडाणी म्हणून हिनवते. परंतु, आता त्याच अंजीला पश्या अस्खलित इंग्लिश बोलून दाखवणार आहे. ज्यामुळे अंजीसह घरातील प्रत्येक जण अचंबित होतो. 

स्टार प्रवाहने अलिकडेच त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्रामवर या मालिकेचा एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये अवनीच्या डोहाळ जेवणाच्या कार्यक्रमात अवनी पश्याची त्याच्या शिक्षणावरुन खिल्ली उडवते. जे पाहून अंजी नाराज होऊन या कार्यक्रमातून निघून जायला निघते. परंतु, त्याचवेळी पश्या तिला थांबवतो आणि अस्खलितपणे इंग्लिश बोलून दाखवतो.

दरम्यान, गेल्या कित्येक दिवसांपासून पश्या अंजीपासून लपवून शिकत असतो. विशेष म्हणजे अंजीला आनंदाचा धक्का द्यावा यासाठी तो हे सगळे प्रयत्न करत असतो. इतकंच नाही तर त्याला सगळ्यांसमोर इंग्रजी बोलताना अंजीसह घरातील प्रत्येत जण थक्क होतो. आता पश्या कसं काय इंग्रजी शिकला. त्यावर अंजीची प्रतिक्रिया काय असेल हे येत्या भागात प्रेक्षकांना कळणार आहे. 

Web Title: sahkutumb sahaparivar tv serial new twist pasha fluently speak in english