सरुने दिली चाहत्यांना गुडन्यूज; नंदिताच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2023 19:31 IST2023-03-23T19:30:21+5:302023-03-23T19:31:44+5:30
Nandita patkar: नंदिताने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत ही आनंदाची बातमी शेअर केली आहे.

सरुने दिली चाहत्यांना गुडन्यूज; नंदिताच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन
छोट्या पडद्यावरील 'सहकुटुंब सहपरिवार' (sahakutumb sahaparivar) या मालिकेने अल्पावधीत प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. त्यामुळे या मालिकेतील प्रत्येक कलाकाराविषयी नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात. यामध्येच मालिकेत सोज्वळ, प्रेमळ सरुची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री नंदिता पाटकर हिने चाहत्यांना एक गुडन्यूज दिली आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत तिने तिच्या घरी नवीन पाहुण्याचं आगमन झाल्याचं सांगितलं आहे.
अभिनेत्री नंदिता पाटकर कलाविश्वासोबतच सोशल मीडियावर सक्रीय आहे. त्यामुळे वरचेवर ती चाहत्यांसाठी काही ना काही पोस्ट शेअर करत असते. यात बऱ्याचदा ती तिच्या वैयक्तिक जीवनातील गोष्टी चाहत्यांसोबत शेअर करते. यावेळी तिने तिच्या जीवनातील आनंदाची गोष्ट शेअर केली आहे.
नंदिताने नुकतीच एक नवी कोरी कार खरेदी केली असून त्याचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. नंदिताने खरेदी केलेली ही तिची पहिली कार आहे. त्यामुळे तिने तिच्या भावना कॅप्शनमधून व्यक्त केल्या आहेत.
दरम्यान, नंदिता मराठी कलाविश्वातील नावाजलेली अभिनेत्री आहे. तिने एलिझाबेथ एकादशी, बाबा यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे.