अवनीने घातला अंजीच्या दुसऱ्या लग्नाचा घाट; रागाच्या भरात सरु उचलणार अवनीवर हात
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2023 18:00 IST2023-03-28T18:00:00+5:302023-03-28T18:00:00+5:30
Sahkutumba sahaparivar: पश्याला विसरुन अंजी थाटणार दुसरा संसार?

अवनीने घातला अंजीच्या दुसऱ्या लग्नाचा घाट; रागाच्या भरात सरु उचलणार अवनीवर हात
'सहकुटुंब सहपरिवार' (sahakutumb sahaparivar) ही मालिका अल्पावधीत लोकप्रिय झाली आहे. या मालिकेतील मोरे कुटुंबाने प्रेक्षकांच्या मनावर अक्षरश: राज्य केलं आहे. मात्र, सध्या गोकुळासारखं नांदणाऱ्या मोरे कुटुंबावर एकवर एक संकटांचा मारा होताना दिसत आहे. यामध्येच पशाच्या मृत्यूनंतर आता अवनीने अंजीच्या दुसऱ्या लग्नाचा घाट घातला आहे. ज्यामुळे संतापलेल्या सरुने पहिल्यांदाच हात उचलला.
'सिरीअल जत्रा' या इन्स्टाग्राम पेजवर सहकुटुंब सहपरिवार या मालिकेचा नवा प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये अवनी, अंजीचं दुसरं लग्न होणार असल्याचं सरुला सांगते, जे ऐकताच सरुच्या रागाचा पारा चढतो आणि ती अवनीच्या कानशिलात लगावते.
पश्याचा मृत्यू झाल्यानंतर एकाकी पडलेल्या अंजीला पुन्हा जोडीदार मिळावा. तिने पुढील आयुष्य आनंदात घालवावं असं अवनीला वाटतं. त्यामुळे प्रशांतची जागा घ्यायला मिहीर तयार असल्याचं अवनी सांगते.
दरम्यान, पश्या जीवंत असल्याचं सत्य सरुला समजलं आहे. त्यामुळे हे सत्य लपवत अंजी दुसरं लग्न करु शकत नाही असं सरु ठामपणे सांगते. परंतु, सरुच्या विरोधानंतरही अंजीचं दुसरं लग्न होणार का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.