सहकुटुंब सहपरिवार: मोरे कुटुंबात होणार चिमुकल्या पावलांचं आगमन; अंजी होणार आई
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2023 16:07 IST2023-04-27T16:07:04+5:302023-04-27T16:07:04+5:30
Sahakutumb sahaparivar: पश्या जिवंत असल्याचं सत्य येणार समोर; काय असे मोरे कुटुंबाची प्रतिक्रिया

सहकुटुंब सहपरिवार: मोरे कुटुंबात होणार चिमुकल्या पावलांचं आगमन; अंजी होणार आई
छोट्या पडद्यावर तुफान गाजलेली मालिका म्हणजे सहकुटुंब सहपरिवार. आजवर या मालिकेने प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन केलं आहे. त्यामुळे या मालिकेविषयीचे प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी प्रेक्षक कमालीचे उत्सुक असतात. यामध्येच सध्या या मालिकेत एक नवा ट्विस्ट आला आहे. कधीही आई न होणारी अंजी चक्क प्रेग्नंट असल्याचं समोर येणार आहे. इतकंच नाही तर तिच्या प्रेग्नंसीमुळे पश्याचं सत्यही समोर येणार आहे.
गेल्या काही दिवसांपासून मोरे कुटुंब आणि पश्या-अंजी यांच्या जीवनात मोठी उलथापालथ झाली आहे. पश्याच्या अकाली निधनामुळे अंजीचं दुसरं लग्न करण्याचा निर्णय मोरे कुटुंबीय घेतात. मात्र, पश्या जिवंत असल्याचं अंजीशिवाय कोणालाही माहित नसतं. परंतु, हे सत्य समोर येणार आहे.
मोरे कुटुंबाने अंजीच्या लग्नाचा दुसरा घाट घालता असून लग्नाची सप्तपदी सुरु असतानाच अंजी अचानकपणे चक्कर येऊन खाली कोसळते. यावेळी डॉक्टरांनी केलेल्या तपासणीमध्ये अंजी प्रेग्नंट असल्याचं समोर येतो. परंतु, पश्याच्या मृत्यूनंतर अंजी प्रेग्नंट कशी काय हा प्रश्न साऱ्यांना पडतो. यामध्येच अंजीचा होणारा नवरा तिला मारायला धावतो. परंतु, याचवेळी पश्या मध्ये येतो आणि त्याला आडवतो.इतकंच नाही तर हे मूल त्याचं असल्याचं साऱ्यांना सांगतो.
दरम्यान, सध्या या मालिकेचा हा प्रोमो व्हायरल होत आहे. परंतु, पश्याला समोर पाहिल्यानंतर साऱ्यांनाच कमालीचा धक्का बसला आहे. इतकंच नाही तर पश्या जिवंत असूनही साऱ्यांच्या समोर का आला नाही, एवढे दिवस तो कुठे होता असे कितीतरी प्रश्न अनुत्तरीत आहेत. त्यामुळे पश्या आता कुटुंबासमोर या सगळ्याची उत्तरं कशी देणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.