लग्नानंतर पश्याने घेतलं रिअल लाइफ अंजीसोबत खंडेरायाचं दर्शन; जेजुरी गडावरचा व्हिडीओ केला शेअर
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2023 19:07 IST2023-04-04T19:07:16+5:302023-04-04T19:07:48+5:30
Akash nalawde: आकाशने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये त्याने पत्नीला कडेवर उचलून जेजुरी गडाच्या पायऱ्या चढल्या.

लग्नानंतर पश्याने घेतलं रिअल लाइफ अंजीसोबत खंडेरायाचं दर्शन; जेजुरी गडावरचा व्हिडीओ केला शेअर
छोट्या पडद्यावर विशेष लोकप्रिय झालेली मालिका म्हणजे 'सहकुटुंब सहपरिवार' (sahakutumb sahaparivar). या मालिकेच्या उत्तम कथानकासह त्यातील कलाकार सोशल मीडियावर चांगलेच चर्चेत येत असतात. त्यातलीच एक जोडी म्हणजे पश्या आणि अंजी. आपल्या खट्याळ स्वभावामुळे या दोन्ही कलाकारांनी अल्पावधीत लोकप्रियता मिळवली. सध्या या मालिकेतील पश्याच्या म्हणजेच अभिनेता आकाश नलावडे (aakash nalawde) चर्चेत येत आहे. अलिकडेच, आकाशने सहपत्नी जेजुरी गडाचं दर्शन घेतलं.
काही दिवसांपूर्वीच आकाश नलावडे याने रुचिका धुरी हिच्यासोबत लग्नगाठ बांधली. या लग्नसोहळ्याचे अनेक फोटो सोशल मीडियावरही व्हायरल झाले होते. त्यानंतर आता आकाशने देवदर्शनाचा व्हिडीओ शेअर केला आहे. लग्नानंतर आकाशने सहपत्नी जेजुरी गडावर जाऊन खंडेरायाचं दर्शन घेतलं आहे.
दरम्यान, आकाशने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये त्याने पत्नीला कडेवर उचलून जेजुरी गडाच्या पायऱ्या चढल्या. त्याचा हा साधेपणा नेटकऱ्यांना विशेष भावला आहे. त्यामुळे त्याच्या हा व्हिडीओ वाऱ्यासारखा व्हायरल होत आहे.