प्रसिद्ध मराठी अभिनेता लवकरच होणार बाबा, पार पडलं पत्नीचं बेबी शॉवर, व्हिडीओ समोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2025 15:53 IST2025-11-01T15:49:16+5:302025-11-01T15:53:30+5:30
मराठी मनोरंजन विश्वातून एक गोड बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध टीव्ही अभिनेता लवकरच बाबा होणार आहे. नुकतंच त्याच्या पत्नीच्या डोहाळेजेवणाचा कार्यक्रमही पार पडला आहे.

प्रसिद्ध मराठी अभिनेता लवकरच होणार बाबा, पार पडलं पत्नीचं बेबी शॉवर, व्हिडीओ समोर
मराठी मनोरंजन विश्वातून एक गोड बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध टीव्ही अभिनेता लवकरच बाबा होणार आहे. नुकतंच त्याच्या पत्नीच्या डोहाळेजेवणाचा कार्यक्रमही पार पडला आहे. हा अभिनेता म्हणजे साधी माणसं फेम आकाश नलावडे आहे. आकाशने काही दिवसांपूर्वीच बाबा होणार असल्याची गुडन्यूज चाहत्यांसोबत शेअर केली होती. आता त्याच्या पत्नीचं बेबी शॉवर झालं आहे. त्याचे फोटो आणि व्हिडीओ समोर आले आहेत.
बेबी शॉवरसाठी आकाश आणि त्याच्या पत्नीने खास लूक केला होता. आकाशने हिरव्या रंगाचा कुर्ता आणि त्यावर डिझायनर जॅकेट परिधान केलं होतं. तर त्याच्या पत्नीने पिवळ्या रंगाची साडी नेसत फ्लॉवर ज्वेलरी घातली होती. आकाशने पत्नीसह बेबी शॉवर सोहळ्यात छोटासा डान्सही केला. आकाशच्या पत्नीचं नाव रुचिका धुरी असं आहे. त्यांनी २०२३ मध्ये लग्नगाठ बांधली होती. आता लग्नाच्या दोन वर्षांनी ते आईबाबा होणार आहेत.
आकाश नलावडे हे मराठी टेलिव्हिजन विश्वातील लोकप्रिय नाव आहे. सहकुटुंब सहपरिवार मालिकेतून तो घराघरात पोहोचला. या मालिकेत पश्या नावाचं पात्र साकारून त्याला प्रचंड लोकप्रियता मिळाली.सध्या हा अभिनेता स्टर प्रवाह वाहिनीवरील साधी माणसं मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करतो आहे. बाबा होणार असल्याने आकाश आनंदी आहे.