सचिनजींना भेदता आलं नव्हतं 'महाभारत'चं चक्रव्यूह, 'कोण होणार करोडपती'मध्ये दिलेलं चुकीचं उत्तर, पाहा व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2025 13:46 IST2025-07-22T13:46:00+5:302025-07-22T13:46:30+5:30

सचिनजींना महाभारतातील एक प्रश्न विचारण्यात आला होता. ३ लाख २० हजारांसाठी सचिन आणि सुप्रिया पिळगावकर यांना महाभारतातील चक्रव्युहाबद्दल प्रश्न विचारला गेला होता. मात्र याचं चुकीचं उत्तर सचिनजींनी दिलं होतं.

sachin pilgaonkar failed to give answer about mahabharat in kon honar karorepati | सचिनजींना भेदता आलं नव्हतं 'महाभारत'चं चक्रव्यूह, 'कोण होणार करोडपती'मध्ये दिलेलं चुकीचं उत्तर, पाहा व्हिडीओ

सचिनजींना भेदता आलं नव्हतं 'महाभारत'चं चक्रव्यूह, 'कोण होणार करोडपती'मध्ये दिलेलं चुकीचं उत्तर, पाहा व्हिडीओ

'कोण होणार करोडपती' हा टीव्हीवरील लोकप्रिय रिएलिटी शो आहे. या शोमध्ये सर्वसामान्यांना कोट्याधीश होण्याची संधी मिळते. यासाठी फक्त काही प्रश्नांची अचूक उत्तर द्यावी लागतात. अनेकदा काही सेलिब्रिटीही या शोमध्ये सहभागी होतात. सचिन पिळगावकर आणि सुप्रिया पिळगावकर यांनी 'कोण होणार करोडपती'मध्ये हजेरी लावली होती. या कार्यक्रमातील त्यांचा जुना व्हिडीओ व्हायरल झाला आहे. 

या शोमध्ये सचिनजींना महाभारतातील एक प्रश्न विचारण्यात आला होता. ३ लाख २० हजारांसाठी सचिन आणि सुप्रिया पिळगावकर यांना महाभारतातील चक्रव्युहाबद्दल प्रश्न विचारला गेला होता. मात्र याचं चुकीचं उत्तर सचिनजींनी दिलं होतं. "महाभारतानुसार कुरुक्षेत्राच्या युद्धात चक्रव्युहाची रचना कोणी केली?" असा प्रश्न त्यांना विचारला गेला होता. यासाठी  A) द्रोणाचार्य B) कृपाचार्य C) जयद्रथ D) भीष्म असे चार पर्याय दिले होते. यातील अचूक पर्याय निवडायचा होता. सचिन पिळगावकरांनी D) भीष्म असं उत्तर दिलं होतं. पण, तेवढ्यात सुप्रिया पिळगावकरांनी लाइफलाइन घ्यायचं ठरवलं. 


त्यांनी 50:50 तळ्यात मळ्यात ही लाइफलाइन वापरली. यामध्ये चुकीची उत्तर काढून टाकण्यात आली. आणि त्यात सचिनजींनी दिलेलं भीष्म हा पर्यायही गेला. त्यानंतर  A) द्रोणाचार्य आणि C) जयद्रथ हे दोन पर्याय शिल्लक राहिले. सुप्रिया यांनी सुचवल्याप्रमाणे सचिनजींनी  A) द्रोणाचार्य हा पर्याय निवडला. आणि हे उत्तर बरोबर होतं. आता 'कोण होणार करोडपती'मधील हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. 

Web Title: sachin pilgaonkar failed to give answer about mahabharat in kon honar karorepati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.