मराठी अभिनेत्याचं शुभमंगल सावधान! सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरसोबत बांधली लग्नगाठ

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2024 16:01 IST2024-11-26T16:01:06+5:302024-11-26T16:01:30+5:30

दिवाळीनंतर अनेक सेलिब्रिटींनी लग्नाचा मुहुर्त गाठला आहे. एक मराठी अभिनेताही लग्नाच्या बेडीत अडकला आहे.

saar kahi tichyasathi fame actor abhishek gaonkar tied knot with sonali gurav wedding photo | मराठी अभिनेत्याचं शुभमंगल सावधान! सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरसोबत बांधली लग्नगाठ

मराठी अभिनेत्याचं शुभमंगल सावधान! सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरसोबत बांधली लग्नगाठ

सध्या सगळीकडेच लग्नाचा माहौल आहे. कलाविश्वातही लग्नाचे वारे वाहत आहेत. दिवाळीनंतर अनेक सेलिब्रिटींनी लग्नाचा मुहुर्त गाठला आहे. एक मराठी अभिनेताही लग्नाच्या बेडीत अडकला आहे. 'सारं काही तिच्यासाठी' फेम अभिनेता अभिषेक गावकर याचं शुभमंगल सावधान झालं आहे. अभिषेकने सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर सोनाली गुरव हिच्याबरोबर लग्नगाठ बांधली आहे. त्यांच्या लग्नातील पहिला फोटो समोर आला आहे. 

अभिषेक आणि सोनालीने मंगळवारी(२६ नोव्हेंबर) लग्नाच्या बेडीत अडकून नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे. पारंपरिक पद्धतीने त्यांचा विवाहसोहळा पार पडला. कुटुंबीय आणि मित्रपरिवाराच्या उपस्थितीत त्यांनी सात फेरे घेतले. आयुष्यातील या खास क्षणासाठी अभिषेक आणि सोनालीने पारंपरिक पेहराव केला होता. सोनालीने नऊवारी साडी नेसली होती. तर अभिषेकने धोतर घातलं होतं. काही महिन्यांपूर्वीच त्यांनी साखरपुडा केला होता. आता ते लग्नाच्या बेडीत अडकले आहेत. 


दरम्यान, अभिषेकने 'रात्रीस खेळ चाले', 'सुख म्हणजे नक्की काय असतं,' 'माझी माणसं', 'हंडरेड डेज' यांसारख्या मालिकांमध्ये काम केलं आहे. तर सोनाली एक सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहे. ती इन्स्टाग्रामवर प्रचंड सक्रिय असून तिचे ३ लाखांहून अधिक फॉलोवर्स आहेत. तिचे अनेक रील व्हिडिओही व्हायरल होत असतात. 

Web Title: saar kahi tichyasathi fame actor abhishek gaonkar tied knot with sonali gurav wedding photo