"...तर मी त्या व्यक्तीला जिवंत सोडणार नाही!"; धमक्या देणाऱ्यांना प्रसिद्ध अभिनेत्याचं सडेतोड उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2025 17:34 IST2025-04-27T17:34:28+5:302025-04-27T17:34:44+5:30
प्रसिद्ध अभिनेत्याला काहीच दिवसांपूर्वी लॉरेन्स बिश्नोई गँगच्या नावाने धमकी मिळाली होती. त्यामुळे अभिनेत्याने एका मुलाखतीत हा खुलासा केला.

"...तर मी त्या व्यक्तीला जिवंत सोडणार नाही!"; धमक्या देणाऱ्यांना प्रसिद्ध अभिनेत्याचं सडेतोड उत्तर
'बिग बॉस १४' फेम अभिनेता अभिनव शुक्ला (abhinav shukla) गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. प्रसिद्ध अभिनेत्री रुबीना दिलेकचा (rubina dilaik) पती आणि अभिनेता अभिनव शुक्लाला अलीकडेच लॉरेंस बिश्नोई गँग आणि आसिम रियाजच्या चाहत्यांकडून जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर अभिनवने एका मुलाखतीत स्पष्टपणे सांगितले की, "जर माझ्या कुटुंबावर संकट आले, तर मी कोणालाही मारण्यास मागेपुढे पाहणार नाही." काय म्हणाला अभिनव, जाणून घ्या
मिळालेल्या धमकीबद्दल अभिनव काय म्हणाला?
शार्दुल पंडितच्या पॉडकास्टमध्ये बोलताना अभिनव अलीकडेच त्याला जी धमकी मिळाली त्याबद्दल व्यक्त झाला. अभिनव म्हणाला की, "मी थोडा जुन्या विचारांचा माणूस आहे. आजच्या काळात आपल्याला त्रास देणाऱ्या एखाद्या व्यक्तीला धडा पोहोचवण्याची ताकद आपल्यात असणे आवश्यक आहे. जर माझ्या कुटुंबाच्या सुरक्षेसाठी मला कोणालाही मारावे लागले, तर मी ते करेन. मी त्या व्यक्तीला जिवंत सोडणार नाही. माझं हे विधान वादग्रस्त आहे. पण कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी मी काहीही करु शकतो."
अभिनव शुक्लाला मिळाली होती धमकी
काही दिवसांपूर्वी अभिनव शुक्लाला अंकित गुप्ता नावाच्या व्यक्तीकडून ही धमकी देण्यात आली आहे. या मेसेजमध्ये, "मी लॉरेन्स बिश्नोईचा माणूस आहे. तुझ्या घराचा पत्ता मला माहीत आहे. गोळी घालायला तुझ्या घरी येऊ का? जसं मी सलमान खानच्या घरी जाऊन गोळीबार केलेला...तसंच तुझ्या घरी एके ४७ घेऊन येईन आणि गोळी मारेन. तू किती वाजता शूटिंगला जातोस हे पण मला माहीत आहे. तुला ही शेवटची वॉर्निंग आहे. असीमला चुकीचं बोलण्याआधी तुझं नाव न्यूजमध्ये येईल. लॉरेन्स बिश्नोई भाई असिमसोबत आहेत. लॉरेन्स बिश्नोई झिंदाबाद", असं म्हटलं गेलं आहे.