Bigg boss: "हमाली हा शब्द वापरता कामा नये. कारण..."; रोशन भजनकरच्या पत्नीची स्पष्ट प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2026 10:57 IST2026-03-01T10:57:19+5:302026-03-01T10:57:45+5:30

Bigg boss marathi: अनेकदा या शोमधील रोशन भजनकर याच्या गेमवर, त्याच्या शांत राहण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जातात. या सगळ्यावर आता त्याच्या पत्नीने तिचं मत मांडलं आहे.

roshan-bhajankar-wife-talks-about-his-game-in-bigg-boss-marathi-6 | Bigg boss: "हमाली हा शब्द वापरता कामा नये. कारण..."; रोशन भजनकरच्या पत्नीची स्पष्ट प्रतिक्रिया

Bigg boss: "हमाली हा शब्द वापरता कामा नये. कारण..."; रोशन भजनकरच्या पत्नीची स्पष्ट प्रतिक्रिया

छोट्या पडद्यावर सध्या गाजत असलेला शो म्हणजे बिग बॉस मराठी (bigg boss marathi). सध्या या शोचा सहावी सीजन सुरु आहे. आतापर्यंत या घरात अनेक राडे, भांडणे झाले आहेत. या सगळ्यातून त्यातील स्पर्धकांचा गेमही दिसून आला. मात्र, अनेकदा या शोमधील रोशन भजनकर याच्या गेमवर, त्याच्या शांत राहण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जातात. या सगळ्यावर आता त्याच्या पत्नीने तिचं मत मांडलं आहे.

रोशनची पत्नी सीमा यांनी नुकतीच 'राजश्री मराठी'ला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने रोशनच्या गेम खेळण्याविषयी तिचं मत मांडलं. ''मला त्यांचा खूप अभिमान वाटतो. ते इतक्या दूरपर्यंत ते जातील असं स्वप्नातही वाटलं नव्हतं. काही लोक शिकूनही पुढे जात नाहीत. पण, ते फक्त त्यांच्या मेहनतीच्या जोरावर पुढे गेले'', असं सीमा म्हणाल्या.

पुढे त्या म्हणतात, ''मला असं वाटतं हमाली हा शब्द वापरता कामा नये. कारण, त्यांचं नाव रोशन आहे. मग त्याच नावाने बोलवावं ना. इतरांना कसं त्यांच्या नावावरुन बोलवलं जातं. तसंच यांनाही बोलवावं.खरं तर ताईंनी (राखी सावंत) हा शब्द वापरायला नको होता.ते दहावीत असल्यापासून हमाली करतात. आणि, ही त्यांची मेहनत आहे.''
 

Web Title : बिग बॉस: रोशन की पत्नी को 'हमाली' शब्द पर आपत्ति।

Web Summary : बिग बॉस मराठी में रोशन भजनकर की पत्नी ने उनका बचाव किया। उन्होंने उनकी यात्रा पर गर्व जताया और 'हमाली' शब्द के इस्तेमाल की आलोचना की, इसके बजाय उनका नाम इस्तेमाल करने का सुझाव दिया, बचपन से उनकी कड़ी मेहनत पर प्रकाश डाला।

Web Title : Bigg Boss: Roshan's wife objects to 'Hamaali' word usage.

Web Summary : Roshan Bhajankar's wife defends him on Bigg Boss Marathi. She expressed pride in his journey and criticized the use of the word 'Hamaali,' suggesting using his name instead, highlighting his hard work since childhood.